Sun, Apr 21, 2019 03:51होमपेज › Konkan › घरगुती वादातून जावेच्या डोक्यात घातला हातोडा

घरगुती वादातून जावेच्या डोक्यात घातला हातोडा

Published On: Sep 13 2018 1:44AM | Last Updated: Sep 12 2018 10:22PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

तालुक्यातील करबुडे येथील लाजूळ येथे घरगुती किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून जावेने दुसर्‍या जावेच्या डोक्यात हातोडा घातल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुप्रिया सुभाष ओरपे (रा. लाजूळ, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तिच्याविरोधात तिची जावू कल्याणी समीर ओरपे यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार कल्याणी ओरपे या एकत्रित कुटुंबात राहतात. त्यांचे पती कामा निमित्त मुंबई येथे असतात. कल्याणी यांच्या जावू  सुप्रिया ओरपे यांच्यासमवेत गेले तीन वर्षे वाद सुरु आहेत. मंगळवारी दुपारी किरकोळ कारणावरुन त्यांच्यात पुन्हा वाद झाला.  तेव्हा तू येथून निघून जा, असे सांगत सुप्रिया जावू कल्याणी यांच्या अंगावर धाऊन आली. यावेळी हातातील लोखंडी हातोडा तिने कल्याणी यांच्या डोक्यात मारल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.

या प्रकरणी पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन कल्याणी ओरपे यांच्याकडून वस्तुस्थिती जाणून घेतली. या प्रकरणी सुप्रिया ओरपे हिच्याविरुद्ध मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.