Tue, May 21, 2019 12:11होमपेज › Konkan › आजपासून बेमुदत उपोषणात रूपांतर

आजपासून बेमुदत उपोषणात रूपांतर

Published On: Mar 23 2018 1:58AM | Last Updated: Mar 22 2018 11:10PMदोडामार्ग : प्रतिनिधी

आरोग्यसेवेसंदर्भातील विविध मागण्यांसाठी सुरू असलेले दोडामार्गवासीयांचे आक्रोश आंदोलन गुरुवारी तिसर्‍या दिवशीही कायम होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळाला चर्चेदरम्यान कुठलाही ठोस निर्णय न मिळाल्याने हे आंदोलन यापुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. आंदोलन तीव्र करण्याचा एक भाग म्हणून शुक्रवार, दि. 23 मार्चपासून आंदोलक बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे या आंदोलनाचे संयोजक वैभव इनामदार यांनी सांगितले.

तालुक्यात सक्षम आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी मंगळवारपासून हजारो तालुकावासीयांनी एकत्र येत जनआक्रोश आंदोलन सुरू केले आहे. मागण्यांवर शासन ठोस निर्णय घेत नसल्याने हे आंदोलन शुक्रवारपासून अधिक आक्रमक करण्याचा निर्णय तालुकावासीयांनी घेतला आहे. बेमुदत आंदोलनाचेे रूपांतर आता आमरण उपोषणात होणार असल्याने याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र सरकारवर राहील, असा इशारा संयोजकांनी दिला आहे. गुरुवारी तिसर्‍या दिवशीही हे आंदोलन सुरू होते. आंदोलनात हजारो तालुकावासीयांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. दिवसभर आंदोलन स्थळी भजन, आंदोलनावर कवितांचे सादरीकरण झाले. 

गोव्यातील वाहतूक रोखण्याचा मनसेचा इशारा

गुरुवारी मध्यरात्रीपासून गोव्याला दूध, भाजीपाला, कोंबड्या घेऊन जाणार्‍या खासगी गाड्या अडवून ठेवल्या जातील. जोवर आरोग्याच्या विविध मागण्या पूर्ण होत नाही. तोवर गाड्या सोडल्या जाणार नसल्याचे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताराम गावकर, उपाध्यक्ष मायकल लोबो यांनी तहसीलदार रोहिणी रजपूत यांना भेट घेऊन सांगितले.

 

Tags : Dodamarg, healthcare service demands, movement,