Thu, Apr 25, 2019 05:26होमपेज › Konkan › डीएड, बीएड बेरोजगारांचा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

डीएड, बीएड बेरोजगारांचा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

दोडामार्ग  ;वार्ताहर 

जिल्ह्यातील बेरोजगार डी.एड, बी.एड.  युवक आता नोकरीसाठी एल्गारच्या तयारीत आहेत. सर्वडी डी.एड, बी.एड. धारक युवक-युवतींनी मंगळवार 3 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ओरोस येथील श्री रवळनाथ मंदिरात  त्यांची बैठक झाली. त्यावेळी मोर्चाचा निर्णय घेण्यात आला.  मंदिरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर जायला सकाळी दहा वाजता मोर्चा निघेल . गेली आठ ते दहा  वर्षे जिल्ह्यात शिक्षक भरती झालेली  नाही. मागील काळात आलेल्या भरतीत स्थानिकांचे प्रमाण नगण्य आहे. प्रत्येक भरतीवेळी जिल्ह्याबाहेरील उमेदवार या ना त्या पद्धतीने या जिल्ह्यात नोकरी मिळवतात, त्यानंतर 3 वर्षे झाली की आंतरजिल्हा बदलीसाठी प्रस्ताव तयार करतात.

त्यांची बदली झाली की पुन्हा नवा लॉट जिल्ह्यात येण्यासाठी तयारच असतो. नोकरीसाठी त्यांच्याकडून अनेक मार्गांचा अवलंब होतो त्यामुळे स्थानिक उमेदवारी नोकरीपासून वंचित राहतात. सध्या जिल्ह्यात असे शेकडो तरुण तरुणी बेरोजगार आहेत. अनेकांचे वय उलटून गेले आहे. अशा स्थितीत त्यांना नोकरीची अत्यंत आवश्यकता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील तरुण-तरुणींनी एकत्र येत बेरोजगारी आणि स्थानिकांवरील अन्याय दूर कारण्यासाठी लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.  

यावेळी डीएड, बीएड बेरोजगार संघटनेची  निवडण्यात आलेली कार्यकारिणी  पुढील प्रमाणे-अध्यक्ष-भिवसेन मसुरकर, उपाध्यक्ष भाग्यश्री रेवडेकर, सचिव लखू खरवत, सदस्य भाग्यश्री नर,  कृपाली शिंदे, रोशनी खांदारे, संकेत हरणे, विनायक जामदाडे, कृष्णल जाधव, सारिका पाटेकर, अभिजीत घुरे, आनंद तळगावकर, चैताली जाधव, माधुरी जाधव, प्रियंका जाधव, हर्षद चोडणकर, गणपत डांगी, सचिन नाईक, अतुल वाडोकर,  मकरंद जैतापकर आणि लक्ष्मण पवार. दरम्यान जिल्ह्यातील सर्व बेरोजगार डीएड, बीएडधारक तरुण-तरुणींनी ओरोस येथील रवळनाथ मंदिरात सकाळी 9 वा उपस्थित रहावे.
 


  •