Tue, Mar 26, 2019 11:42होमपेज › Konkan › निर्णय न झाल्यास दोडामार्गातील सर्व शासकीय कार्यालये बंद पाडू!

निर्णय न झाल्यास दोडामार्गातील सर्व शासकीय कार्यालये बंद पाडू!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

दोडामार्ग  ; प्रतिनिधी

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. तरीही त्यांनी दोडामार्ग तालुक्यात सुरू असलेल्या जनआक्रोश आंदोलनाची साधी दखल घेतलेली नाही, अशा निद्रिस्त मंत्र्यांना व शासनाला जागे करण्यासाठी तालुक्यातील महिलांनी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्यातील शासकीय रुग्णालयात मोफत रुग्णसेवेबाबत येत्या दोन दिवसांत सकारात्मक निर्णय न झाल्यास दोडामार्गमधील सर्व शासकीय कार्यालये बंद पाडू, असा सज्जड इशारा आंदोलनकर्त्या महिलांनी दिला. आरोग्य सेवेच्या विविध मागण्यांसाठी दोडामार्ग तालुकावासीयांनी 20 मार्चपासून बेमुदत ‘जनआक्रोश आंदोलन सुरू केले आहे.  
 

 

 

 

tags ; Dodamarg,news, People's agitation movement Decision


  •