होमपेज › Konkan › सिंधुदुर्गातील डॉक्टर्स आज संपावर

सिंधुदुर्गातील डॉक्टर्स आज संपावर

Published On: Jan 02 2018 1:09AM | Last Updated: Jan 01 2018 10:20PM

बुकमार्क करा
कुडाळ : प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाच्या मसुद्याविरोधात मंगळवार, 2 जानेवारी रोजी सकाळी 6 पासून सायंकाळी 6 वा. पर्यंत सिंधुदुर्गातील वैद्यकीय सेवा बंद ठेवून डॉक्टर संपावर जाऊन काळा दिवस पाळणार  आहेत, अशी माहिती  इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. संजय केसरे यांनी दिली. 

केंद्र सरकारच्या  या विधेयकाचा मसुदा डॉक्टरांना मान्य नसल्याने या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन शासनासोबत गेले वर्षभर चर्चा करीत आहे. मात्र, शासनाकडून  कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. 

नवीन विधेयकामुळे भ्रष्टाचार वाढेल. खासगी वैद्यकीय कॉलेजवर कोणताही धाक राहणार नाही. एमबीबीएस नंतर पात्रता परीक्षा द्यावी लागेल, परदेशी डॉक्टरांना नोंदणीशिवाय व्यवसाय करण्यास परवानगी मिळेल, डॉक्टरांच्या लोकशाहीवर गदा येईल आदी सर्व मुद्द्यांकडे इंडियन मेडिकल असोसिएशनने शासनाचे लक्ष वेधले आहे. 

मंगळवारी डॉ. संपावर जात असले तरी तत्काळ आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा चालू राहणार आहे. याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनने केंद्रीय मंत्री ना. सुरेश प्रभू, खा. विनायक राऊत, खा. गुलाब नबी आझाद, खा. हुसेन दलवाई, खा. अशोक चव्हाण, खा. राजीव सातव यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. 

मंगळवारी डॉ. संपावर जात असल्याने जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने डॉ. राजेश्‍वर उबाळे, डॉ. संजय केसरे, डॉ. अजित लिंबये, डॉ. आंबेरकर यांनी केले 
आहे.