Fri, Feb 22, 2019 12:36होमपेज › Konkan › नव्या मोबाईल टॉवरद्वारे जिल्हा  ९९ टक्के कव्हरेजमध्ये  : खा. राऊत

नव्या मोबाईल टॉवरद्वारे जिल्हा  ९९ टक्के कव्हरेजमध्ये  : खा. राऊत

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 16 2018 10:58PMसावंतवाडी : प्रतिनिधी

बीटीएसच्या नव्या मोबाईल टॉवरद्वारे सिंधुदुर्ग जिल्हा 99 टक्के कव्हरेजमध्ये येईल आणि आता असलेली 95 टक्केची फिक्‍वेन्सी 98 टक्क्यांवर जाईल, असा विश्‍वास  खा. विनायक राऊत व सिंधुदुर्ग-रत्नागिरी-कोल्हापूरचे महाप्रबंधक संजीव कुमार चौधरी यांनी व्यक्‍त केला. 

दुरसंचारच्या सल्‍लागार समितीची बैठक खा. विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी येथे पार पडली. यावेळी मोबाईल टॉवरचे महाप्रबंधक सुहास कांबळे, मुख्य लेखाधिकारी ए.आर. सावंत, सहाय्यक महाप्रबंधक सौ. अनघा भोसले, एम.एम. क्षीरसागर तसेच समिती सदस्य रुपेश राऊळ, विलास साळसकर, गणेश तांबे, दीपलक्ष्मी पडते, प्रदीप सर्पे, गोविंद सावंत तसेच जि. प. गटनेते नागेंद्र परब, जि. प. सदस्य मायकल डिसोजा, चंद्रकांत कासार, राजू शेटकर, अधिकारी आर. एस. मोरे, श्री. सोनवणे, मिलिंद केळकर आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत खा.राऊत व संजीवकुमार चौधरी यांनी बैठकीतील निर्णयाची माहिती दिली.

मोबाईल फ्रिक्‍वेन्सीची समस्या मार्च-एप्रिलदरम्यान दूर होईल, असा विश्‍वास व्यक्‍त क रुन 50 टक्केपेक्षा जास्त लॅण्डलाईन टेलिफोन बंद असल्याबाबतची कारणे शोधून नियोजनबद्ध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना केल्याची माहिती त्यांनी दिली. ग्रामपंचायतींना जोडणार्‍या नोपा कनेक्शनची प्रगती चांगली असून मार्च ते एप्रिल दरम्यान सर्वच्या सर्व 315 ग्रामपंचायतींना कनेक्शन मिळावे याबरोबर वैभववाडी आणि दोडामार्ग तालुक्यालाही नोपाने जोडण्यात येईल असेही ते म्हणाले.

सदस्य गणेश तांबे यांनी आंगणेवाडी, कुणकेश्‍वर, आकेरी या शिवरात्रौत्सव तसेच जिल्ह्यात होणार्‍या मोठ्या आंगणेवाडी, सोनुर्लीसारख्या जत्रोत्सवामध्ये मोबाईल टॉवरची सुविधा देण्याची सूचना केली असून तसा प्रयत्न केला जाईल, असेही खा.राऊत म्हणाले.