Wed, Mar 27, 2019 04:27होमपेज › Konkan › जि.प.चे 15 कोटींचे अंदाजपत्रक

जि.प.चे 15 कोटींचे अंदाजपत्रक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण बैठकीत सन 2017-18 चे अंतिम सुधारित 22 कोटी 41 लाखांचे व सन 2018-19 चे 15 कोटी 75 लाखांचे मूळ अंदाजपत्रक वित्त व शिक्षण समिती सभापती दीपक नागले यांनी सादर केले. काही दुरुस्त्या सुचवून हे अंदाजपत्रक सभागृहात मंजूर करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत, उपाध्यक्ष संतोष थेराडे, सीईओ लक्ष्मीनारायण मिश्रा, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश बामणे, सभापती अरुण कदम, ॠतुजा खांडेकर आदी उपस्थित होते. या दोन्ही अंदाजपत्रकांमध्ये विभागांच्या मागणीप्रमाणे भरीव तरतूद करता आली नसली, तरीसुद्धा प्रत्येक विभागाला पुरेशी तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे. 
 
सन 2016-17 या वित्तीय वर्षातील प्रत्यक्ष जमा व प्रत्यक्ष खर्चाचा विचार करता प्रत्यक्षात दिनांक 1 एप्रिल 2017 रोजी आरंभीची शिल्‍लक रक्‍कम रुपये 5,11,46,752 रुपये एवढी राहिली आहे, असे सांगितले.  सन 2017-18ची सुधारित महसूली जमा रक्‍कम रुपये 17,30,07,748 एवढी विचारात घेऊन रक्‍कम रुपये 22,41,54,500 महसुली खर्चासाठी उपलब्ध होणार आहे. तसेच सन 2018-19च्या मूळ अंदाजपत्रकात आरंभीची शिल्‍लक रुपये 55,630 एवढी राहिली आहे. सन 2019-19ची अंदाजित महसुली जमा रक्‍कम रुपये 15,75,06,400 एवढी विचारात घेऊन आरंभीच्या शिलकेसह 15,75,62,030 महसुली खर्चासाठी उपलब्ध होणार आहे. सन 2017-18च्या मूळ अंदाजपत्रकापेक्षा सुधारित व अंतिम सुधारीत अंदाजपत्रक जास्त रकमेचे आहे.

मूळ अंदापत्रक तयार करताना प्रथम कमी रकमेचे अंदाजपत्रक तयार करावे लागते. कारण त्यावळी पुढील वित्तीय वर्षात नेमके किती अनुदान मिळेल याचा अंदाज करता येत नाही. जर जादा रकमेचे अंदाजपत्रक केले आणि त्याप्रमाणे जिल्हा परिषदेला अनुदान प्राप्त झाले नाही तर तरतूद केल्याप्रमाणे योजनांच्या खर्चासाठी रक्‍कम उपलब्ध होऊ शकत नाही त्यामुळे केलेले अंदाजपत्रक वास्तववादी होत नाही. ते विचारात घेऊन सन 2017-18 चे अंतिम सुधारित अंदाजपत्रक आणि सन 2018-19 चे मूळ अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.    

Tags : Kokan, Kokan News, District, budget, 15 crores


  •