Thu, Apr 25, 2019 21:28होमपेज › Konkan › जिल्हाधिकारी भवनात जीवघेणे ‘मॉकड्रील’

जिल्हाधिकारी भवनात जीवघेणे ‘मॉकड्रील’

Published On: Jan 12 2018 1:53AM | Last Updated: Jan 11 2018 11:01PM

बुकमार्क करा
ओरोस : प्रतिनिधी

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एका मागून एक स्फोटांचा आवाज ऐकून जिल्हा मुख्यालयातील कर्मचार्‍यांची एकच धावपळ उडाली. जीव वाचविण्यासाठी झालेल्या धावपळीत सरंबळ येथील एकनाथ कदम हे जायबंदी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी  जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची ही  शासकीय कार्यालयातील रंगीत तालीम अंध, अपंग, वृद्ध, गरोदर महिलांसाठी जीवावर बेतणारी ठरली.

सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी एकामागून एक असे तीन स्फोट घडवून आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम केली. यामुळे कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांची तसेच विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी  नेहमीप्रमाणे अभ्यागतांची  वर्दळ होती. दुपारी 1  वा. च्या सुमारास जिल्हाधिकारी भवनातील तळमजल्यावर एकामागून एक असे तीन स्फोट झाले.
 

स्फोटाच्या आवाजाने आणि धूर पसरल्याने सर्वच कर्मचार्‍यांसह कामासाठी आलेल्या अभ्यागतांची धावपळ उडाली.  इमारतीमध्ये असलेल्या अरूंद जागेमध्ये कुठल्या बाजूने पळावे  अशी स्थिती सर्वांचीच झाली.  
भयभीत कर्मचार्‍यांसह लोकांनी मिळेल त्या मार्गाने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.