होमपेज › Konkan › जिल्ह्याची भू-जलपातळी खालावली

जिल्ह्याची भू-जलपातळी खालावली

Published On: Dec 02 2017 12:39AM | Last Updated: Dec 01 2017 11:25PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

गत वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात  साडेसहाशे मिलीमीटर कमी पाऊस झाला. त्याचा परिणाम भूजल  पातळीवर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे ऑक्टोबर अखेरीस झालेल्या भूजल विभागाच्या सर्वेक्षणात जिल्ह्यात पाणीपातळी 0.06 मीटर इतकी घटली आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये गतवर्षीच्या पाणी पातळीची आकडेवारीही गतवर्षीच्या तुलनेत  कमी झाल्याचे  सर्वेक्षणात आढळल्याने आगामी वर्षातही उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात सरासरी पाऊस 3,545 मि.मी. पडला. गतवर्षीच याच कालावधीत 4,185 मिमीची नोंद झाली होती. राजापूर, चिपळुणात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला; मात्र, उर्वरित सात तालुक्यांत पावसाची आकडेवारी घटली आहे.  ऑक्टोबरअखेरपर्यंत परतीचा पावसाचा राबता जिल्ह्यात असला तरी तो टप्प्याटप्प्याने पडल्याने या वर्षी सिंचनाचे टप्पेही खालावल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

भूगर्भ विभागाकडून ऑक्टोबर  

महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील 162 विहिरींचा जलस्तर तपासण्यात आला. यावर्षी जिल्ह्यात विश्रांती घेत पाऊस पडला. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात चांगली नोंद झाली. मात्र, गतवर्षाच्या तुलनेत पाऊस पिछाडीवरच होता.   त्यामुळे जलस्तर घटला असून तो 0.06 मीटरने खालावला आहे. खेड तालुक्यात सर्वाधिक घट निदशर्र्नास आली आहे. खेड तालुक्यात तपसण्यात आलेल्या  विहिरींच्या पातळीपैकी 16 विहिरीतील जलस्तर 0.09 मीटरने घटला आहे. तर गुहागरमध्ये तपासण्यात आलेल्या सात  विहिरींतील जलस्तर 0.03  मीटरने खालवल्याचे निदशर्र्नास आले आहे.

दरवर्षी सर्वसाधारणपणे खेड तालुक्यात पहिला टँकर धावतो.  जलस्तर घटल्याने  या वर्षी मार्चच्या आधीच टँकर धावण्याची शक्यता आहे. त्या द‍ृष्टीने प्रशासनाने पाणटंचाईचे नियोजन सुरू केले आहे. उर्वरित चार तालुक्यांतील सरासरी पातळीत वाढ दर्शविते; परंतु, गतवर्षीच्या आकडेवारीशी तुलना केली तर त्यात तफावत आहे.