Tue, Mar 19, 2019 20:27होमपेज › Konkan › स्वच्छता अभियान ही सामाजिक जबाबदारी

स्वच्छता अभियान ही सामाजिक जबाबदारी

Published On: Sep 06 2018 10:08PM | Last Updated: Sep 06 2018 8:56PMचिपळूण : खास प्रतिनिधी

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान हे सामूहिक कार्य आहे. या अभियानात रत्नागिरी जिल्ह्याला बक्षीस मिळवून देण्याचा आपण संकल्प केला आहे. त्याद‍ृष्टीने चिपळूण तालुक्यात पहिली कार्यशाळा होत आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानात सामाजिक जबाबदारी म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आँचल गोयल यांनी केले. 

चिपळूण पं. स.च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात गुरुवारी सकाळी आ. सदानंद चव्हाण यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी गटविकास अधिकारी सरिता पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी अरुण जाधव आदी उपस्थित होते. 

सीईओ गोयल यांनी स्वच्छता अभियानाविषयी माहिती देताना सांगितले की, या अभियानात आता आमूलाग्र बदल झाला आहे. गावातील एक प्रभागसुद्धा यात सहभागी होऊ शकतो. त्यालाही बक्षीस ठेवण्यात आले आहे. प्रभाग, गाव, तालुका, जिल्हा, विभागस्तरावर अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पं. स.ला 50 लाख तर जि. प.साठी 1 कोटीचे बक्षीस आहे. रत्नागिरी जि. प.ने हे बक्षीस मिळविण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी सर्वांनी साथ द्यावी. सरपंच, जि. प., पं. स. सदस्य व लोकप्रतिनिधींनी अभियान राविण्यासाठी पुढे यावे. अभियानासाठी लागणार्‍या सात बाबींची पूर्तता करण्यात यावी, असे सांगून स्वच्छ भारत अभियानात प्रत्येक व्यक्‍तीने सहभागी व्हावे म्हणजे अभियान यशस्वी होईल. यावेळी आ. सदानंद चव्हाण यांनी, शासनाला आज स्वच्छता अभियान राबवावे लागत आहे. खरेतर स्वच्छता राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मात्र, आज त्यासाठी जनजागृती करुन बक्षीस ठेवावे लागते. त्यामुळे या विषयी जागरुकता यायला हवी, असे सांगितले.  यावेळी गटविकास अधिकारी सरिता पवार यांनी स्वच्छता अभियानामध्ये चिपळूण तालुक्यातील दहा गावांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचे सांगितले. आणखी काही गावे सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्‍त केली. यावेळी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.

ग्रामसेवकांचा घेतला समाचार
या कार्यशाळेच्या निमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी आँचल गोयल यांनी तालुक्यातील ग्रामसेवक व सरपंचांची उलट तपासणी घेतली. 130 ग्रा.पं. असताना किती लोक हजर आहेत याचा अंदाज घेतला. स्वच्छता अभियानात कळवंडेला 173 गुण, तर कुटरे गावाला सर्वात कमी गुण आहेत. त्यामुळे ज्या ग्रा.पं. यामध्ये आहेत त्यांना काम करण्याची संधी आहे. या संदर्भात अनेक ग्रामसेवकांचा यावेळी समाचार घेतला.