Sun, Sep 23, 2018 13:51होमपेज › Konkan › महावितरण कंत्राटी कामगारांमध्ये फूट

महावितरण कंत्राटी कामगारांमध्ये फूट

Published On: Feb 10 2018 11:17PM | Last Updated: Feb 10 2018 10:41PMकुडाळ : प्रतिनिधी

महावितरण सिंधुदुर्ग मंडळ कार्यालयांतर्गत रिक्‍त असणार्‍या तांत्रिक, अतांत्रिक पदावरील कंत्राटी कामगारांच्या ठेक्यावरून सिंधुदुर्गात वाद निर्माण झाला आहे. या वादामुळे जिल्ह्यातील 302 कंत्राटी कामगारांपैकी बहुतांशी कामगार कामावर हजर झाले नाहीत, असे अजय गावडे यांच्याकडून सांगितले जात आहे. मात्र, सद्यस्थितीत 150 हून अधिक कंत्राटी कामगार रूजू झाले असल्याचे महावितरणचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांनी सांगितले. 

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने हा ठेका पूर्वीप्रमाणे आपल्याला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कामगार कामावर हजर होणार नाहीत, असा पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे महावितरणने ज्या बीड येथील मे. एम.डी.इटेक या शासकीय कंत्राटदारास ठेका दिला आहे त्या ठेकेदारास कंत्राटी कामगारांचा विरोध असल्याचे कामगारांच्या वतीने महाराष्ट्र वीज कंत्राटी संघाचे जिल्हा प्रतिनिधी अजय गावडे यांनी सांगितले. या  वादामुळे जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन केलेे होते.