Mon, Aug 19, 2019 00:42होमपेज › Konkan › रत्नागिरीतील डिजिटल शाळा ‘इन्टअ‍ॅक्टिव्ह व्हिडीओ’ने जोडणार

रत्नागिरीतील डिजिटल शाळा ‘इन्टअ‍ॅक्टिव्ह व्हिडीओ’ने जोडणार

Published On: Jun 29 2018 12:07AM | Last Updated: Jun 28 2018 8:58PMओरोस : प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबविलेले इन्टअ‍ॅक्टिव्ह व्हिडोओ कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सहावी ते आठवीच्या वर्गातील 944 डिजिटल शाळांमध्ये राबविण्याचा मानस असून जि. प. पदाधिकारी यांच्या चर्चेनंतर जास्तीत जास्त शाळा डिजिटल आणि इन्टअ‍ॅक्टिव्ह व्हिडोओ कार्यक्रमांनी जोडण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती नूतन प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

सिंधुदुर्गचे नूतन प्रा. शिक्षणाधिकारी म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातून एकनाथ आंबोकर यांनी पदभार स्वीकारला, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.कक्ष अधिकारी विनायक पिंगुळकर उपस्थित होते. 

श्री.आंबोकर म्हणाले, रत्नागिरी येथे पहिली ते पाचवीपर्यंत इन्टअ‍ॅक्टिव्ह व्हिडोओ ‘यु ट्युब’च्या माध्यमातून सर्वच विषयासाठी एक नवी दिशा दिली.  त्याला राज्यभरात उत्तम प्रतिसाद मिळाला.टीव्ही,मोबाईल,लॅपटॉपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना याची आवड निर्माण व्हावी या दृष्टीने आपला प्रयत्न आहे. सहावी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम घेण्याचा मानस आहे.

डिजिटल नंतर इन्टअ‍ॅक्टिव्ह व्हिडोओ हा पुढचा टप्पा असून इयत्तांनुसार प्रोग्राम डाऊनलोड करून घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले.पुस्तकी वाचनांची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी, पुस्तकांतील माहिती आत्मसात करावी व वर्कबुकच्या ऐवजी इन्टअ‍ॅक्टीव्ह व्हिडोओ कार्यक्रम पर्याय म्हणून यापुढच्या काळात राबविला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्ह्यात 1442 शाळांपैकी 944 शाळा डिजिटल शाळा झाल्या आहेत. उर्वरित शाळा डिजिटल करण्यासाठी शासनाच्या जिल्हानियोजन व जि. प. च्या माध्यमातून निधी उपलब्धतेसाठी जि. प. पदाधिकार्‍यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येणार आहे.