Tue, Mar 19, 2019 12:03होमपेज › Konkan › डिगस काळंबादेवी मंदिरात कलशारोहण सोहळा उत्साहात

डिगस काळंबादेवी मंदिरात कलशारोहण सोहळा उत्साहात

Published On: May 01 2018 1:16AM | Last Updated: Apr 30 2018 9:34PMकुडाळ : शहर वार्ताहर

डिगस गावची ग्रामदेवता श्री काळंबा देवी मंदिरात  पंचकुंडी  पुनः प्रतिष्ठा  व कलशारोहण  सोहळा सोमवारी  भक्‍तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. श्रींच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील भाविक -भक्‍तांची अलोट गर्दी झाली होती. 

27 एप्रिल  रोजी या सोहळ्याला भक्‍तिमय  वातावरणात  प्रारंभ झाला. गेले चार दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. सोमवारी स्थापित देवतापूजन,शिखर कलशाची स्थापना प.पू. जगद‍्गुरू शंकराचार्य संस्थान  मठ-संकेश्‍वर करवीर मठाचे  सच्चिदानंद  अभिनव  विद्यानृसिंह  भारती संकेश्‍वर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर परिवारसह देवी प्रतिष्ठा, तत्त्वन्यास, प्राणप्रतिष्ठा, महापूजा, अभिषेक,आरती आदी  धार्मिक  कार्यक्रम पार पडले. देवस्थान उपसमितीचे  अध्यक्ष विठ्ठल पवार, मानकरी दाजी पवार, पांडुरंग पवार आदीसह मानकरी-सेवेकरी व डिगस ग्रामस्थ उपस्थित होते.
दुपारी महाप्रसादाचा लाभ भविकांनी घेतला. दरम्यान आ. वैभव  नाईक यांनी सोहळ्याला भेट देत श्रींचे दर्शन घेतले. त्यांचा देवस्थान समितीच्या वतीने माजी आ. पुष्पसेन सावंत व अध्यक्ष  विठ्ठल  पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  आ.नाईक यांनीही भाविकांसोबत महाप्रसाद घेतला. जि.प.सदस्य अमरसेन सावंत, पं.स.सदस्य जयभारत पालव, सौ. शितल कल्याणकर, माजी सरपंच बाळा पवार तसेच भुपतसेन  सावंत, नंदु तावडे, यशवंत पवार, राजू पवार, संतोष रामचंद्र पवार, सदाशिव पवार आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

दै. ‘पुढारी’ विशेषांकाचे प्रकाशन

डिगस गावची ग्रामदेवता  श्री काळंबादेवी  मंदिर पंचकुंडी  पुनःप्रतिष्ठा व शिखर कलशारोहण  सोहळ्याच्या  दै. ‘पुढारी’ विशेषांकाचे  सोमवारी मान्यवरांच्या  हस्ते प्रकाशन  करण्यात आले. देवस्थान उपसमितीचे  अध्यक्ष विठ्ठल पवार, जि.प.सदस्य अमरसेन सावंत, पं.स.सदस्य जयभारत पालव,  भूपतसेन सावंत, नंदु तावडे, यशवंत पवार, सदाशिव  पवार, संतोष रामचंद्र पवार  दै. ‘पुढारी’चे पत्रकार काशिराम गायकवाड आदीसह  ग्रामस्थ उपस्थित होते. 

Tags : Konkan, Digas Kalamba devi, Kalasharokhan, ceremony