Sat, Apr 20, 2019 09:56होमपेज › Konkan › आरक्षणासाठी कुडाळात धनगर समाजाची रॅली

आरक्षणासाठी कुडाळात धनगर समाजाची रॅली

Published On: Aug 14 2018 1:08AM | Last Updated: Aug 13 2018 10:16PMकुडाळ : शहर वार्ताहर

धनगर समाजाला राज्यघटनेत दिलेल्या अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी कुडाळ तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने सोमवारी कुडाळ शहरात रॅली काढत शक्‍तिप्रदर्शन केले. सरकारने धनगर समाजास आरक्षण देण्यासंदर्भात ठोस भूमिका न घेतल्यास 1 सप्टेंबरपासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या समितीने नायब तहसीलदार टी.एच.मठकर यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी गेली  4 वर्षे सरकारकडे महाराष्ट्रातील धनगर समाज करीत आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसून राज्य सरकार धनगर समाजावर अन्याय करीत आहे. 31 ऑगस्टपर्यंत सरकारने याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, अन्यथा 1 सप्टेंबरपासून धनगर समाज तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा क्रांती समितीने निवेदनाद्वारे दिला. या मागणीचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणीस यांच्याकडे सादर करण्यात येणारे निवेदन नायब तहसीलदार श्री. मठकर यांच्याकडे देण्यात आले. शहरात मोटरसायकल रॅली काढण्यात आली. 

त्यानंतर तहसीलदारांकडे निवेदन सादर करण्यात आले.  जिल्हा समन्वयक कानू शेळके, दीपक खरात, प्रभाकर बुटे, रामचंद्र कांबळे, किशोर बरक, शरद खरात, अनिल झोरे, सुरेश झोरे आदींसह तालुक्यातील धनगर समाज बांधव उपस्थित होते.