Sun, Jul 21, 2019 12:28होमपेज › Konkan › देवरुखच्या 200 विद्यार्थ्यांचे शिवछत्रपतींवर महानाट्य

देवरुखच्या 200 विद्यार्थ्यांचे शिवछत्रपतींवर महानाट्य

Published On: May 04 2018 10:35PM | Last Updated: May 04 2018 10:22PMदेवरुख : प्रतिनिधी

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या 200 विद्यार्थ्यांना घेऊन कलाशिक्षक  दिगंबर मांडवकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण ते शिवराज्यभिषेक हा जीवनप्रवास महानाट्याच्या स्वरुपात तयार केला आहे. शुभारंभाचा प्रयोग देवरुख पित्रे कलामंचात 13 मे रोजी होणार आहे.

शालेय मुलांच्याा अंगभूत कलागुणांना वाव देतानाच मुलांच्या मेहनतीतून आर्थिक मदत शाळेलाच मिळवून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महानाट्य सादर होणार आहे.

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाने या नाट्यनिर्मितीसाठी प्रथम हात पुढे केला आहे. विविध वयोगटांतील मुले सादरीकरण करणार आहेत. गीत, संगीत,अभिनय या माध्यमातून छञपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध वैशिष्ट्यपूर्ण प्रसंग सादर केले जाणार आहेत.शिवरायांचे बालपण, संवगडी, गुरु, रायरेश्वराची शपथ, तह, युद्धनीती, शत्रूवर मिळवलेला विजय, गनिमी कावे,अफझलखान वध, शाहिस्तेखान प्रसंग, बाजीप्रभू, पावनखिंड थरार, राज्याभिषेक यासारखे प्रसंग सादर केले जाणार आहेत.

या महानाट्याचे मुरलीधर चांदिवडे सूत्रधार आहेत, गणेश जंगम यांची ध्वनी व प्रकाशयोजना असणार आहे. अक्षय साळवी व स्वप्नाली शिंदे व सहकारी यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. संगीत व दिग्दर्शक म्हणून कलाशिक्षक दिगंबर मांडवकर यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे.

या महानाट्यासाठी वेशभूषा, केशभूषा यासह घोडे पायदळ, ढाली, तलवारी, निशाणे, भगवा माहोल तयार केले जाणार आहे. शिवराज्यभिषेकानंतर खराखुरा घोडा रंगमंचावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शालेयस्तरावरील मुलांनाा घे ऊन हा ऐतिहासिक  व्यावसायिक प्रयोग करण्याचे धाडसच म्हणावे लागत आहे. या प्रयोगासाठी सदानंद भागवत, मदन मोडक,अरुण शिंदे यांचे चांगले सहकार्य मिळत आहे.13 तारखेला पित्र कलामंच येथे पहिला प्रयोग होणार आहे.