होमपेज › Konkan › देवरूख नगर पंचायतीची निवडणूक होणार चुरशीची!

देवरूख नगर पंचायतीची निवडणूक होणार चुरशीची!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

देवरूख नगरपंचायत निवडणुकीच्या अर्ज छाननीत बाद ठरलेल्या नगराध्यक्षपदाच्या 2 उमेदवारांसह नगरसेवकपदाच्या 8 उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात दाद मागितली होती. याबाबत बुधवार 28 मार्च रोजी निर्णय देताना न्यायालयाने सर्व अर्ज वैध ठरवून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांचा निर्णय चुकीचा ठरवला. त्यामुळे देवरूख न.पं.च्या रिंगणात सर्वच उमेदवार असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी अवैध अर्ज ठरवल्याने 10 उमेदवारांनी जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागितली. याची सुनावणी 26 मार्च रोजी होणार  होती. ती  त्यादिवशी न होता बुधवार 28  मार्च रोजी झाली. उमेदवारांमध्ये नगराध्यक्षपदाच्या दोन उमेदवारांचा समावेश असून त्यामध्ये मृणाल अभिजित शेट्ये (भाजप) व स्मिता संतोष लाड (राष्ट्रवादी-आघाडी) यांचा समावेश आहे. तर नगरसेवकपदासाठी दाखल केलेल्या अर्जात छाननीवेळी बाद ठरलेेले अश्‍विनी अनंत पाताडे (भाजप), स्नेहा संदीप वेल्हाळ (काँग्रेस), वैष्णवी विजय कांगणे (काँग्रेस), कल्पना चंद्रकांत केसरकर (अपक्ष), सुरेश गंगाराम पांचाळ (अपक्ष), राजेंद्र व्यंकप्पा गवंडी (भाजप), वैभव रवींद्र कदम (भाजप), रामदास शंकर निवळकर (अपक्ष) आदींचा समावेश होता. 

Tags : Kokan, Kokan News, Devrukh, Nagar Panchayat, elections,  churashichi


  •