Wed, Mar 20, 2019 22:57होमपेज › Konkan › देवरुख नगराध्यक्षपद भाजपकडे; मृणाल शेट्ये विजयी

देवरुख नगर पंचायतीत भाजपची बाजी

Published On: Apr 12 2018 11:58AM | Last Updated: Apr 12 2018 12:39PMदेवरुख : पुढारी ऑनलाईन

देवरुख नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मृणाल शेट्ये विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या स्मिता लाड, शिवसेनेच्या धनश्री बोरुकर यांचा पराभव केला. नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या बोरुकर यांचा ११९ मतांनी पराभव करुन मृणाल शेटे यांचा विजय झाला. त्यांना २ हजार ४३५ मते मिळाली. शिवसेनेच्या बोरुकर यांना २ हजार ३१६ तर राष्ट्रवादीच्या स्मिता लाड यांना १ हजार ९८१ मते मिळाली.

देवरूख नगर पंचायतीच्या १७ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजप-मनसे युतीने सर्वाधिक आठ जागांवर विजय मिळवला. यापैकी भाजपला 7 तर मनसेला 1 जागा मिळाली. यापूर्वी वैभवी पर्शराम या बिनविरोध अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. अपक्ष नगरसेवक आपल्या सोबत घेऊन बहुमताचा आकडा गाठू शकते. 

विजयी उमेदवार

भाजप : वैभव कदम, धनश्री आंबेकर, आश्विनी पाताडे, ऱेश्मा किर्वे, संतोष केदारी, सुशांत मुळ्ये, राजेंद्र गवंडी 

शिवसेना : प्रकाश मोरे, वैभव पवार, निदा कापडी, अनुष्का टिळेकर

राष्ट्रवादी : उल्हास नलावडे, प्रफुल्ल भुवड, प्रेरणा पुसाळकर 

काँगेस : प्रतिक्षा वणकुद्रे 

मनसे : सान्वी संसारे 

अपक्ष : वैभवी पर्शराम (बिनविरोध)

Tags : Election, Devrukh, Nagar Panchayat, BJP, Shivsena, NCP, Congress, MNS