Fri, Feb 22, 2019 18:09होमपेज › Konkan › घरात घुसून महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

घरात घुसून महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

देवगड : प्रतिनिधी

जामसंडे- वाडातर रोड येथे सौ. केसकली शिवगोपाल निसाद (35) या महिलेला घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी हरीओम श्रीपाल निसाद याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवार दि. 27 रोजी रात्री 9 वा. घडली.

शिवगोपाळ निसाद हे रद्दीव्यावसायिक असून ते भाड्याने राहत आहेत. त्यांच्याकडे कामाला असलेला  कामगार काम सोडून हरीओम श्रीपाल निसाद (27, रा. जामसंडे टिळकनगर) यांच्याकडे कामाला होता. शिवगोपाल निसाद हे लकव्याने आजारी असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी सोमवारी रात्री तो घरी गेला होता.याचदरम्यान हरीओम निसाद यांनी शिवगोपाल यांच्या घरी जावून कामगाराला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. म्हणून शिवगोपाल यांची पत्नी केसकली यांनी शिवीगाळ का करता, अशी विचारणा केली याचा राग येवून त्यांनी सौ.केसकली यांच्या मानेला पकडून मंगळसुत्र तोडून शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सौ. केसकली निसाद यांनी देवगड पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हरीओम श्रीपाल निसाद याच्याविरूध्द  गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस नाईक प्रशांत जाधव करीत आहे.