Thu, Mar 21, 2019 15:53होमपेज › Konkan › देवगड तालुकाही लवकरच पर्यटनक्षेत्रात अग्रेसर : आ. राणे

देवगड तालुकाही लवकरच पर्यटनक्षेत्रात अग्रेसर : आ. राणे

Published On: Jan 01 2018 1:59AM | Last Updated: Dec 31 2017 9:10PM

बुकमार्क करा
देवगड : प्रतिनिधी

 जिल्हा पर्यटन क्षेत्रात सध्या मालवणचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते, मात्र भविष्यात देवगड तालुका हा पर्यटनक्षेत्रात अग्रेसर तालुका म्हणून गणला जाईल, असा विश्‍वास आ. नीतेश राणे यांनी व्यक्त केले.देवगड येथे आयोजित  ‘जल्लोष 2018’ या कार्यक्रमाचा शुभारंभ शनिवारी आ. राणे यांच्या हस्ते  झाला.  यावेळी ते बोलत होते.

आ. राणे म्हणाले,  तीन वर्षापूर्वी देवगड तालुक्याची ओळख ही  मागास तालुका म्हणून होती. मात्र तो पुरोगामी आणि विकासासाठी अग्रेसर ठरावा म्हणून माझे प्रयत्न सुरु आहेत.देवगडमध्ये लवकरच स्कुबा ड्रायव्हींग सेंटर सुरु होणार असून दोन स्क्रीनचे चित्रपटगृह सुरु करणार आहोत.येथे वॅक्स म्युझियम सुरु झाल्याने देवगडमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने वाढ होत आहे.यापूर्वी विकासासाठी अथवा प्रकल्पासाठी विरोधाचे पत्र देण्याची पध्दत देवगड तालुक्यात होती.मात्र आता तालुक्याची मानसिकता अशाच जल्लोष सारख्या कार्यक्रमाने बदलेल असा आशावाद आ. राणे यांनी व्यक्त केला. देवगड तालुक्याच्या सर्वांगीन विकासासाठी मी सतत संघर्ष करत असतो. अन्य तालुक्याला मिळणारा निधी  देवगड तालुक्याला मिळायला हवा.यासाठी मी  आग्रही असतो, यामुळे भविष्यात हा तालुका जिल्हयात अग्रेसर असेल असे प्रतिपादन त्यांनी  केले.

नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, उपनगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, कोकण माती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड, अ‍ॅड.अविनाश माणगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी परितोष कंकाळ, प्रकाश राणे, एकनाथ तेली, पोलिस निरिक्षक जयकुमार सुर्यवंशी, तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली, संदिप साटम, व्यापारी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष हनीफशेठ मेमन, शामराव पाटील व सर्व व्यापारी बांधव यावेळी उपस्थित होते. नगर पंचायतीच्यावतीने देवगड मधील उपक्रमांची माहिती देणार्‍या स्टॉलचे उदघाटन आ. नितेश राणे यांनी  के ले.