होमपेज › Konkan › स्कूबा ड्रायव्हिंग व वॉटर स्पोर्टस्मुळे देवगडचे अर्थकारण बदलेल

स्कूबा ड्रायव्हिंग व वॉटर स्पोर्टस्मुळे देवगडचे अर्थकारण बदलेल

Published On: Jan 22 2018 1:24AM | Last Updated: Jan 21 2018 10:02PMदेवगड : प्रतिनिधी

  स्कूबा ड्रायव्हिंग व वॉटर स्पोर्टस प्रकल्पामुळे देवगडचे अर्थकारण बदलून जाईल, असा विश्‍वास व्यक्‍त आमदार नितेश राणे यांनी व्यक्‍त केला.या प्रकल्पानंतर 20 फेब्रुवारी रोजी देवगडमध्ये मिनी थिएटर सुरू करणार, अशी घोषणा आमदार नितेश राणे यांनी यावेळी केली. देवगड जामसंडे नगरपंचायत आणि सिंधुदुर्ग अ‍ॅडव्हेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड बीच स्कूबा ड्रायव्हींग व वॉटर स्पोर्टस प्रकल्पाचा शुभारंभ आ. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

नगराध्यक्षा सौ.प्रियांका साळसकर, उपनगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष निशिकांत साटम, व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष प्रसाद पारकर, व्यापारी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष हनिफ मेमन, स्वाभिमान पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बाळा खडपे, तालुकाध्यक्ष संदीप साटम, डॉ.अमोल तेली, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रकाश राणे, डॉ.मिलींद कुळकर्णी, डॉ.सुनिल आठवले, नगरपंचायत विरोधी गटनेते ए.वाय्.जाधव, अ‍ॅडव्हेंचर संस्थेचे संचालक विरेंद्र सावंत, वैभव दांडेकर आदी उपस्थित  होते.

आम. नितेश राणे म्हणाले, देवगडमधील जनतेने पर्यटक देवगडमध्ये  येतील असे वातावरण निर्माण करण्याची गरज असून यासाठी देवगड बीच येथे सुरूवात केलेल्या स्कूबा 
ड्रायव्हिंग व वॉटर स्पोर्टस प्रकल्पाप्रमाणेच आणखी प्रकल्प येथील स्थानिक तरूणांना सुरू केले पाहिजे यासाठी बँकांमार्फत आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी सहकार्य करू,असे आश्‍वासन दिले. येथील अर्थकारण हे आंबा, मासळी यावर अवलंबून होते मात्र निसर्गातील बदलामुळे या व्यावसायांची शाश्‍वती राहिली नाही, त्याला पर्यायी व्यवसाय म्हणून  येथे  पर्यटनात्मक प्रकल्प राबवून  आर्थिक समृध्दीसाठी आपण हे पाऊल टाकले असून अशाप्रकारचे प्रकल्प सुरू करताना कोणाकडून नासधुस करण्याचा प्रकार यापुढे झाला तरीही  मागे हटणार नाही.

ते पुन्हा सुरू करू,असे त्यांनी ठणकावून सांगीतले.मालवण तालुक्यात तारकर्लीमध्ये 8 व देवबागमध्ये 4 स्कूबा ड्रायव्हींग सेंटर आहेत देवगडमध्ये आता प्रकल्पाची सुरूवात होतेय यावरून आपण किती मागे आहोत याचा विचार करण्याची गरज असून त्यादृष्टीने येथील युवावर्गाने प्रकल्प सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
निशिकांत साटम, डॉ.मिलींद कुळकर्णी, डॉ.सुनील आठवले, प्रसाद पारकर, प्रकाश राणे, संदीप साटम, ए.वाय्.जाधव यांनी विचार मांडले.प्रास्ताविक नगराध्यक्षा सौ.प्रियांका साळसकर, सूत्रसंचालन व आभार सौ.तन्वी चांदोस्कर यांनी  मानले.