Mon, Feb 18, 2019 04:16होमपेज › Konkan › देवगड बीच महोत्सवाची ‘जल्लोषी’ सांगता

देवगड बीच महोत्सवाची ‘जल्लोषी’ सांगता

Published On: Jan 02 2018 1:09AM | Last Updated: Jan 01 2018 10:15PM

बुकमार्क करा
देवगड : प्रतिनिधी

जल्लोष या देवगड बीचवरती दोन दिवस चालणा-या कार्यक्रमाला रविवारी रात्री उशिरा हजारो रसिक पर्यटकांनी उपस्थिती दर्शविली होती.  अभिनेत्री कविता निकम व सिध्दार्थ जाधव यांनी देवगड वासियांना मंत्रमुग्ध केले होते. नलोफर खान डायमंड डान्स कु्र प्रस्तुत डान्स धमाका रसिक श्रोत्यांचे मनोरंजन करुन उत्साह वाढविणारा ठरला.या जल्लोष कार्यक्रमाला झालेल्या गर्दीने देवगड बीच गजबजले होते.
30 व 31 डिसेंबर रोजी जल्लोष या कार्यक्रमाचे आयोजन देवगड व्यापारी संस्थेने केले होते. 31 डिसेंबर रोजी कविता निकम व सिध्दार्थ जाधव यांच्या  गाण्यांने देवगडकरांची मने जिंकली होती. उत्सवा निमित्त अनेक खादय पदार्थाचे स्टॉल उभारण्यात आले होते. बीचवरील वाळू शिल्प  पर्यटकांनी आकर्षित करणारी ठरत होती.  महोत्सवाला हजारो पर्यटकांनी उपस्थिती दर्शविली. या महोत्सवांतर्गत चित्रकला,पाककला,वाळुशिल्प अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जल्लोष कार्यक्रमामुळे देवगड बीचवरती दोन दिवस लाखो रुपयांची उलाढाल झाली.