Sun, Aug 25, 2019 08:41होमपेज › Konkan › ग्रामस्वच्छता अभियानात पावणाई गाव देवगडात प्रथम

ग्रामस्वच्छता अभियानात पावणाई गाव देवगडात प्रथम

Published On: Feb 06 2018 1:46AM | Last Updated: Feb 05 2018 11:23PMदेवगड : प्रतिनिधी

देवगड तालुक्यातील पावणाई गावाने संतगाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायतीला सभापती जयश्री आडिवरेकर, उपसभापती संजय देवरुखकर व गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांच्या हस्ते  सन्माचिन्ह देऊन गौरविण्यात आले.  पंचायत समिती सदस्य व खाते प्रमुख तसेच पुरस्कार प्राप्त पावणाई ग्रामपंचायतीचे सरपंच गोविंद लाड, ग्रामसेवक हनुमंत तेर्से, तळवडे सरपंच पूजा दुखंडे, ग्रामसेवक गुणवंत पाटील आदी उपस्थित होते. गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांच्या मार्गदर्शनाखाली 72 ग्रामपंचायतीमध्ये संतगाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले होते.

यामध्ये स्वच्छ घर सजावट स्पर्धा,स्वच्छ गोठा स्पर्धा, स्वच्छता अभियान, हात धुवा दिन,जागतिक शौचालय दिन,वैयक्‍तीक स्वच्छता जनजागृती, शाळेमध्ये स्वच्छते संदर्भात मार्गदर्शन तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले होते. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात देवगड तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पावणाई गावाने पटकाविला तर द्वितीय तळवडे व तृतीय वळीवंडे गावाने मिळविला आहे. या विजेत्या ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50 हजार व तृतीय क्रमांक 25 हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. या तालुकास्तरीय तपासणीमध्ये गुणपत्रिकेनुसार तपासणी करण्यात आली.

यामध्ये वैयक्‍तीक शौचालय, पाणीपट्टी वसुली, नळ कनेक्शन, इंटरनेट, शाळा अंगणवाडी, हात धुण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थापन तसेच शौचालय पाहणी, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य उपकेंद्राची माहिती,लोकसहभागातून झालेली विकासकामे, गावातील एकोपा, पाण्याची सुविधा व शुध्दीकारण तसेच संत गाडगेबाबा अंतर्गत राबविण्यात आलेले उपक्रमांची माहिती तसेच शासकिय इमारतींची पाहणी करण्यात आली. देवगड तालुक्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सभापती जयश्री आडिवरेकर,उपसभापती संजय देवरुखकर व गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी विशेष नियोजन केले होते.