Sun, Nov 18, 2018 05:32होमपेज › Konkan › देवगड ग्रामीण रुग्णालय इमारत भूमिपूजन कार्यक्रमावर आ. राणेंचा बहिष्कार

देवगड ग्रामीण रुग्णालय इमारत भूमिपूजन कार्यक्रमावर आ. राणेंचा बहिष्कार

Published On: Jun 30 2018 1:17AM | Last Updated: Jun 29 2018 9:54PMदेवगड ः प्रतिनिधी

देवगड ग्रामीण रूग्णालय इमारत भूमिपूजन कार्यक्रम म्हणजे देवगडवासीयांची थट्टा असून या कार्यक्रमावर आपण बहिष्कार टाकत असल्याचे आ. नितेश राणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्या उपस्थितीत देवगड ग्रामीण रूग्णालय इमारतीचे आज शनिवारी होणार आहे. याबाबत बोलताना आ. राणे म्हणाले, या कार्यक्रमाचे आमंत्रण आपल्याला शेवटच्या क्षणी मिळाले. हा कार्यक्रम म्हणजे देवगडवासियांची थट्टा असल्याची भावना स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आपली झाली आहे.ग्रामीण रूग्णालयाची दुर्दशा झाल्याचे पाहिल्यानंतर नवीन इमारतीचे भूमीपूजन करण्याचे नाटक कशाला? असा सवाल समस्त देवगडवासियांचा आहे.

आरोग्यमंत्र्यांनी व त्यांच्या अधिकार्‍यांनी सध्या असलेल्या रूग्णालयाची अवस्था बदलणे आवश्यक आहे. डॉक्टरांची व कर्मचार्‍यांची रिक्‍त पदे, औषधांचा तुटवडा आणि मिळत असलेली आरोग्य सुविधा याबाबत काहीच न करता आम्ही काहीतरी करून दाखवित आहोत असे दाखविण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका आ. राणे यांनी केली.