Sun, Mar 24, 2019 22:58
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › देवगड-गिर्ये समुद्रात ७ पर्ससीन नौका पकडल्या

देवगड-गिर्ये समुद्रात ७ पर्ससीन नौका पकडल्या

Published On: Mar 01 2018 1:36AM | Last Updated: Feb 28 2018 10:58PMदेवगड : प्रतिनिधी

गिर्ये पवनचक्कीसमोर समुद्रात तीन ते चार वावामध्ये प्रतिबंधित जलधी क्षेत्रात अनधिकृतपणे मासेमारी करताना  विजयदुर्ग पोलिस व सागरी पोलिस विभागाच्या पोलिस कर्मचार्‍यांनी संयुक्त कारवाई करत साखरीनाटे येथील 7 पर्सनेट नौकांना पकडल्या. ही कारवाई बुधवारी सकाळी 10.30 वा. च्या सुमारास केली. विजयदुर्ग पोलिस व सागरी पोलिस विभागाच्या पोलिस कर्मचार्‍यांनी ‘कल्याणी’ या गस्तीनौकेने त्या ठिकाणी जाऊन अनधिकृतपणे मच्छीमारी करणार्‍या नौकांना ताब्यात घेतले. यामध्ये नौका सर्जिल (नौकामालक शकीरा  अय्याज हुना) कर्मचारी 19, धनश्री (नौकामालक संतोष काशीनाथ चव्हाण) कर्मचारी 18, नौका यारब (नौकामालक इरफान अब्दुल लतीफ) कर्मचारी 20, नौका अल हमीद (नौकामालक सादिक इब्राहिम गवंडे) कर्मचारी 20, नौका अजिज (नौकामालक मुनाफ अब्बास कोतवडकर) कर्मचारी 12, नौका महम्मद कासीम अब्दुल्ला (नौकामालक बशीर मेमन पंगेरकर) कर्मचारी 21, नौका अर्श अफरान (नौकामालक इसरार बशीर हुना) कर्मचारी 16 (सर्व नौका साखरीनाटे) या नौकांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी देवगड बंदरात आणण्यात आले. ही कारवाई विजयदुर्ग पोलिस स्टेशनचे पो. कॉ.शितोळे, सागरी पोलिस दलाचे पो.कॉ.पी.ए.तरवडकर, बोटमास्टर मेंदाडकर, टी.एल.बोरकर यांनी केली.अनधिकृतपणे मच्छीमारी करताना पकडलेल्या साखरीनाटे येथील सातही पर्सनेट नौकांना देवगड बंदरात आणले.