Thu, Dec 12, 2019 09:48होमपेज › Konkan › सागरमाला प्रकल्पातून कोकणचा विकास

सागरमाला प्रकल्पातून कोकणचा विकास

Published On: Feb 20 2018 1:17AM | Last Updated: Feb 19 2018 11:45PMपनवेल : विक्रम बाबर

सागरमाला प्रकल्पाच्या माध्यमातून रत्नागीरी , सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांचा सर्वांगिण विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रामुख्याने खोल समुद्रात येथील मच्छीमारांना मच्छीमारी करता यावी म्हणून ट्रॉलर्स पुरविल्या जाणार आहेत. यासाठी करंजाडी, वर्सोवा, रत्नागीरी मिरकरवाडा, विजयदुर्ग येथे केंद्रे उभी केली जातील. त्याचबरोबर क्रुझ पर्यटनाला चालना देण्यासाठी क्रुझ टर्मिनलही उभारली जातील, असे सांगत सागर संपत्तीचा योग्य वापर करण्यासाठी कोकणात जलमार्गांचे जाळे निर्माण करणे, ड्रायफ्रुट प्रोजेक्ट उभारणे आणि डीपीटीमार्फत पोर्ट कंटेनरची स्थापना करम्याचे धोरण सरकारने हाती घेतल्याचे गडकरी म्हणाले, सागरमाला ंतर्गत सिंधुदुर्गला 100 कोटी, रत्नागिरीला 70 कोटी तर रायगड मुंबईसाठी 800 कोटींचे प्रकल्प हाती घेतल्याचेही गडकरी म्हणाले. मच्छीमार ट्रॉलर साठी आठ करोडची तरतुद करण्यात आली आहे. या सर्व बंदरांना रेल्वेची कनेक्टीव्हीटीही दिली जाईल, अशी ग्वाहीही गडकरी यांनी दिली.

पनवेल येथे आंतराष्ट्रीय विमानतळ भूमिपूजन जेएनपीटी चौथ्या बंदराचा उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.   केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, सागरमाला प्रकल्पामुळे कोकणातील मच्छीमारांना मोठा फायदा होणार असून ते आता ट्रॉलर्समुळे खोल समुद्रात 200 नॉटीकल इतक्या अंतरावर मासेमारी करू शकतील. मुंबईमध्ये पुढील काळात 950 क्रुज येणार असून त्यामुळे रोजगारामध्ये मोठी वाढ होणार आहे. रायगड आणि मुंबई या दोन्ही जिल्ह्यातील युवकांना नौकाबांधणी आणि सागरी क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येत असून सव्वा लाख भूमिपुत्रांना त्यातून नोकर्‍या उपलब्ध होतील.

माल वाहतुकीला चालना देण्यासाठी मनमाड ते इंदोर या रेल्वेमार्गाच्या निर्मितीसाठी जेएनपीटीने 6 हजार कोटी गुंतवणूक केली आहे.  तसेच जालना, वर्धा येथे ड्राय पोर्ट उभारणी सुरू असून नाशिक व सांगली येथे लवकरच कार्यान्वित केले जाईल. नवी मुंबईतील कंटेनर वाहतूक कमी करण्यासाठी बीपीटी येथे कंटेनरसाठी विशेष व्यवस्था करण्यात येत असल्याचे सांगितले.  कोकणात मासेमारी अधिक विकसित करण्यासाठी विविध बंदरांचा लवकरच विकास होऊन मच्छीमारांसाठी सुविधा निर्माण होतील, रायगड हे कोकण भूमीची सुरवात आहे या कोकण क्षेत्राला हजारो किलोमीटरचा किनारा लाभला आहे. या किनारा क्षेत्राचा वापर आपण ट्रान्सपोर्ट क्षेत्रासाठी करणार असुन या सोबत मच्छिमार बांधवांसाठी फ्रिजिग पोर्ट सुरू करणार आहे.

रत्नाागिरी, करंजा रायगड, वर्सोवा, वाधना, आणि आनंदवाडी परिसरात हे पोर्ट नियोजित असून काही कालावधीत या कामना सुरवात होणार आहे. तर रतकगिरी तसेच सिंधुदुर्ग येथे या पोर्टचे काम सुरू झाले आहे. या मुळे या सव्वा लाख कोकण पुत्रांना या मधून रोजगारत्याच्या गावात आणि त्यांच्या प्रांतात मिळणार आहे.सिंगापूर पोर्ट सारखे 100 हुन अधिक कंटेनर पोर्ट ची स्थापना करून राज्याला लाभलेल्या किनारा क्षेत्रात हे पोर्ट उभे केले जाणार आहे. त्या मुळे आपण विश्‍व व्यापाराला गवसणी घालू आशा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दाखवला आहे. तसेच हे जलमार्ग एयर पोर्ट सोबत जोडणार असल्याचे त्यांनी सांगितले त्या मुळे इम्पोर्ट आणि एक्स्पोर्ट सुलभ रित्या होउन नवीन विकासाला गवसणी घालू असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात उत्पादित होणार्‍या शेतमालाला देश विदेशात स्थान प्राप्ती साठी ड्राय पोर्ट सारखे पोर्ट उपयुक्त ठरणार आहे. वर्धा, जालना, नाशिक सांगली या सारख्या परिसरातील शेतकर्‍यांच्या मालाला एक्स्पोर्टची झालर मिळणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यानि सिंगापूर पोर्ट 30 महिन्यात सुरू करू अशी घोषणा केली होती मात्र. आम्ही हे काम 28 महिन्यात पूर्ण करून दाखवून सगरमळाच्या प्रकल्पाला सुरवात केली आहे. सिंगापूर पोर्ट मधून 24 लाख कंटेनर ये जा करणार आहे.