Wed, Jul 17, 2019 18:02होमपेज › Konkan › आचरा : रामेश्वर राजा जलविहारासाठी निघाला!

आचरा : रामेश्वर राजा जलविहारासाठी निघाला!

Published On: Feb 07 2018 4:19PM | Last Updated: Feb 07 2018 6:50PMआचरा : उदय बापर्डेकर

सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेली इनामदार श्री देवी रामेश्वराची ऐतिहासिक डाळपस्वारी ९ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. आचरे संस्थानचा राजा असलेल्या श्री देव रामेश्वर रयतेची सुखदु:खे जाणून घेण्यासाठी भक्तांच्या दारी जात आहे. डाळपस्वारीच्या माध्यमातून श्री देव रामेश्वर रयतेच्या संपूर्ण रक्षणाची हमीच देत आहे. "श्री " स्वागतासाठी संपूर्ण आचरे गाव नववधूसारखे नटले आहे. शासनाच्या ग्रामस्वच्छता अभियानालाही लाजवेल एवढी स्वच्छता व सौंदर्य  या डाळपस्वारीनिमित्त  अनुभवता येत आहे.

शनिवारी ' श्री ' ची स्वारी  गाऊडवाडी  येथील ब्राम्हणदेव  मंदिरातून  रवाना  झाली. गाऊडवाडी येथील  लोकांची गाऱ्हाणी आणि  ओट्या स्वीकारत दुपारी  बोटीतून जामडूल बेटाकडे गेली. जामडूलच्या जनतेची गाऱ्हाणी ऐकण्या अगोदर जामडूल खाडीपात्राच्या  पलीकडे  असलेल्या पिरावाडी येथील हजरत पीर इब्राहिम खलील या पिराला  भेट देत आदरपूर्वक मान राखून याठिकाणी समस्त रयतेची गाऱ्हाणी  ऐकली .जामडूलवासीयांनी श्री च्या स्वागताची जय्यत तयारी केली होती.

या ठिकाणी विश्रांती घेतल्यानंतर श्री ची स्वारी होडीतून " जलविहार " करत जामडूल बेटावरून पिरावाडी येथे गेली. श्री च्या स्वारीचे स्वागत पिरावाडीवासीयांनी मोठ्या धुमधडाक्यात केले. येथे काही काळ विसावल्यानंतर श्री ची स्वारी हिर्लेवाडी  येथील शिवापूरच्या बांधावरून  माडाच्या झावळीच्या  चुडीच्या प्रकाशातून  देव तरंगाचे त्वेषाने  धावत जाऊन भक्तांना भेट देतात. तसेच ठिकठिकाणची  देव तरंगाची आनंदी झुलवे नृत्ये , ही केवळ  प्रेक्षणीय नसून दर्शनीयही असतात.राञी उशीरा ब्राम्हणदेव मंदिरात विश्रांतीसाठी श्रीची स्वारी विश्रांतीसाठी  थांबली .गुरूवारी पहाटे स्वारी नागझरी  येथील गिरवळी (पूर्वीआकारी) मंदिरात दाखल होणार आहे. गुरूवारी श्री ची स्वारी तिथेच विश्रांतीसाठी थांबणार आहे. शुक्रवार दि ९ फेब्रुवारी ला गिरावळी मंदिरातून सकाळी आचरा बाजारपेठमार्गे  तिठा श्री ब्राम्हणमंदिर नागोचीवाडी येथे जाणार आहे. तेथून पारवाडी मार्गे ब्राम्हणदेव मंदिरात रात्री पोहचणार आहे. व मध्य रात्री पुन्हा श्री रामेश्वर मंदिर येथे परतणार आहे. मंदिराला प्रदक्षिणा घालून गांगेश्वर मंदिरात थांबणार आहे.

जामडूल बेटावर जेरॉन फ़र्नांडिस व मोतेस फ़र्नांडिस याच्या कडून सर्व भाविकांच्या महाप्रसादची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच रात्री भाविकांना हिर्लेवाडी मंडळाकडून रात्रौच्या जेणाची व्यवस्था करण्यात आली होती. पूर्वोच्या काळी गुळ ,पाणी लिंबू सरबताच्या सोयीने पार पडणारी डाळपस्वारी आज हजारो भाविकांच्या पंक्तीच्या पंक्ती उठून संपन्न होत आहे. श्री ची स्वारी ज्या ज्या मार्गाने जाते तो सगळा मार्ग लखलखीत करून तो संपूर्ण मार्ग सजवला आहे. श्री रामेश्वर या पंचाक्षरी मंञाभोवतीच सपूर्ण  आचरा गाव फिरत आहे.