Thu, Jul 18, 2019 20:43होमपेज › Konkan › कणकवलीत बाहेरील व्यक्तींचा हस्तक्षेप नको

कणकवलीत बाहेरील व्यक्तींचा हस्तक्षेप नको

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सावंतवाडी : प्रतिनिधी 

कणकवली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदारसंघात मतदाराव्यतीरिक्त  बाहेरच्या व्यक्तींनी मतदारसंघात थांबू नये. तसे आढळल्यास त्यांच्यावर कारवाईचा इशारा पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी दिला.

 सोमवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते.  पोलिस निरीक्षक सुनील धनावडे उपस्थित होते. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा व कणकवलीत  बाहेरच्या मंडळींनी येऊन वातावरण बिघडवू नये. कायदा व सुव्यवस्था राखली गेली पाहिजे. निकोप वातावरणात निवडणूक व्हावी यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. कणकवली शहरात फिक्स पॉईंट लावले जात आहेत. मतदारांनी कोणतीही भीती बाळगू नये. निवडणूक कालावधीत कणकवलीतील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जादा पोलीस फोर्स तैनात करण्यात येणार आहे. मतदारांनी निर्भय होऊन मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यातील अवैध दारुचा वाहतूक व विक्री रोखण्यासाठी  रेडी, आरोंदा, सातार्डा, दाणोलीसह कणकवली-जानवली येथे  एन्ट्री पॉईंट उभारल्याचे त्यांनी सांगितले.   या चेकपोस्टवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. बोगस मतदानाबाबत तक्रारी येताच कारवाई केली जाणार आहे. 

पत्रकार व पोलिस अभियान राबविणार
सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग कुडाळ या तालुक्यात अल्पवयीन मुले वाहन चालवितात. अशांवर कारवाईची मोहीम राबविणार असल्याचे ते म्हणाले. यासाठी पोलीस व पत्रकार अशी संयुक्त मोहीम राबविण्यात येणार आहे. काळ्या काचावर, फॅन्सी गाड्याचे नंबर, गाड्यांसोबत नंबरप्लेट्स लावण्याची पद्धत जुनी होती. नियमाप्रमाणे पालकांवर कारवाई करण्याची तरतूद आहे. दररोज सायंकाळी दोन तास ही कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले.

Tags : sawantwadi, Deputy Superintendent of Police Dayanand Gawas


  •