Tue, May 21, 2019 12:09होमपेज › Konkan › घरबांधणी अधिकारासाठी सेनेचे निदर्शन

घरबांधणी अधिकारासाठी सेनेचे निदर्शन

Published On: Dec 23 2017 2:06AM | Last Updated: Dec 22 2017 10:54PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : शहर वार्ताहर

राज्य शासनाने ग्रामपंचायतीकडील घर बांधणीचे अधिकार काढून घेतल्याबाबत वा सरकाने याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याबाबत शिवसेनेच्यावतीने नागपूर येथे चालु अधिवेशनामध्ये विधानभवना बाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

कोकणात गावठाण हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून वाडया व वस्त्यांमध्ये गांवे विारलेली असल्याने महसूल विभागाकडून घरबांधणी वा दुरुस्तीची परवानगी घेणे ग्रामीण भागातील ग्रामस्थांना अशक्य असल्याने त्यासंबंधी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री दिपक केसरकर, ना.दादा भुसे यांच्याकडे गेली अनेक वर्षे सतत पाठपुरावा कोकण पक्षप्रतोद आ.राजन साळवी केला. त्यावेळी घेण्यात आलेल्या बैठकांमध्ये प्रस्ताव सादर करण्यात आले. 

हे प्रस्ताव महसूल व नगरविकास विभागाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आले. परंतु महसुल व नगरविकास विभागाने मंजूरी देऊन आजतागायत कॅबिनेटला मान्यतेसाठी पाठविला नसल्याने नाईलाजास्तव पुन्हा एकदा शिवसेनेच्या आमदारांनी विधानभवना बाहेर निदर्शने करण्यात केली.

यावेळी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. या निवेदनाद्वारे कोकणातील सर्व आमदारांची तातडीने बैठक लावून घर बांधणी व दुरुस्तीचे अधिकार ग्रामपंचायतींना देण्यासंबंधी कॅबिनेटमध्ये तात्काळी निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी केली आहे. 

कोकणातील ग्रामीण भागातील हा अत्यंत महत्वाचा विषय आ.राजन साळवी यांनी अधिवेशनादरम्यान अनेक वेळा शासन दफ्तरी मांडून गेली वर्षभरापासून ग्रामीण भागातील ग्रामस्थांना अडचणी ठरणारा हा विषय मार्गस्थ लागण्याचा प्रयत्न करीत आहे. ही निदर्शने करताना शिवसेना कोकण पक्षप्रतोद आ.राजन साळवी समवेत आ.भरत गोगावले, आ.प्रकाश सुर्वे, आ.सुनील शिंदे, आ.मनोहर भोईर,आ.रुपेश म्हात्रे उपस्थित होते.  आ. राजन साळवी यांनी वेळोवेळी ग्रामविकास मंत्र्यांना याविषयी निवेदने दिलेली आहेत. कोकणचा हा विषय नित्याने मांडूनही आणि युतीचे शासन असूनही पदरी निराशा पडत असल्याने निदर्शन करण्यात आले.