Thu, Jul 18, 2019 04:31होमपेज › Konkan › वाढत्या तापमानामुळे पक्ष्यांमध्ये डीहायड्रेशन

वाढत्या तापमानामुळे पक्ष्यांमध्ये डीहायड्रेशन

Published On: Mar 04 2018 1:42AM | Last Updated: Mar 03 2018 10:53PMरत्नागिरी : प्रतिनिधी

यंदा उन्हाचा दाह सरासरी एक  अंश सेल्सिअसने वाढता असताना वाढत्या तापमानाने नैसर्गिक घटक असलेल्या सर्वच पक्ष्यांमध्ये   डीहायड्रेशनचा धोका संभवणार असल्याने पक्षीप्रेमींमध्ये  चिंतेचे वातावरण आहे. 

पाण्याच्या कमालीच्या दुर्भिक्षामुळे पक्ष्यांच्या किलबिलाटासह  त्यांच्या आरोग्यावरही मोठा परिणाम घडवून आणणारे तापमानाने होत चाललेल्या प्रजातीही नष्ट होण्याची भीती व्यक्‍त करण्यात येत आहे. या विषयीची  चिंता अलीकडेच झालेल्या कृषी महोत्सवात एका चर्चासत्रातही व्यक्‍त केली होती. यासाठी आता पक्ष्यांसाठी राखीव पाणवठे उपलब्ध  करून देण्याची मागणी पक्षीमित्रांकडून करण्यात येत आहे.

वातावरणामध्ये दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. वाढत्या तापमानाचा माणसावर परिणाम  होत असताना आता पक्ष्यांनाही त्याची झळ पोहोचू लागली आहे. वाढलेल्या तापमानाने पक्ष्यांच्या पोटातील जलस्तर आटू लागल्याने कोकणात दरवर्षी येणार्‍या अनेक पक्ष्यांच्या संख्येत घट होऊ लागल्याची कैफियत डॉ. शशिकांत मेनन यांनी मांडली होती. 

पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याचे आवाहन

कडक उन्हातून अन्‍नाच्या शोधासाठी फिरणार्‍या पक्ष्यांनाही पाणी शोधण्याचे अतिरिक्‍त काम वाढले आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचे शरीर गरम होऊ लागले असून त्यांची पाण्याची गरज कृत्रिम मार्गाने भागवणे गरजेेचे  झाले असल्याचे मत पक्षीमित्र सुशील कदम यांनी व्यक्‍त केले. यासाठी घरातील खिडकी, अंगणात,  व्हरांड्यात, गच्चीवर आणि झाडांवर पाणवठे तयार करावेत. त्यामुळे पक्ष्यांना तहान भागविता येईल.