Fri, Feb 22, 2019 16:29होमपेज › Konkan › डाव्या हाताने आशीर्वाद देणारा देवरुखचा जर्मन गणेश!

डाव्या हाताने आशीर्वाद देणारा देवरुखचा जर्मन गणेश!

Published On: Sep 13 2018 1:44AM | Last Updated: Sep 12 2018 10:25PMदेवरुख : प्रतिनिधी

देवरुख येथील प्रा. राम घाणेकर यांच्या निवासस्थानी स्थानापन्न होणारी गणेशमूर्ती ही आगळी वेगळी असते. ही गणेशमूर्ती चक्‍क डाव्या हाताने आशीर्वाद देणारी  असल्याने भाविकांसाठी आकर्षण ठरली आहे.

बाप्पाचा उजवा हात हा खरा आशीर्वाद देणारा. मात्र, घाणेकरांकडील गणपती डाव्या हाताने आशीर्वाद देतो. या गणेशमूर्तीला जर्मन गणेश असे नाव आहे. परंपरेपासून ही अशी मूर्ती पुजली जाते असे घाणेकर सांगतात. याचा तपशीलवार इतिहास मात्र उपलब्ध नाही. ही एकच मूर्ती असल्याने देवरुखचे मूर्तिकार उदय भिडे हे दरवर्षी करुन देतात. डाव्या हाताने आशीर्वाद देणाराहा जर्मन गणेश शहरवासियांना कुतूहलाचा विषय ठरतो. गुरुवार जर्मन गणेशाची विधीवत प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे.