Wed, Apr 24, 2019 00:06होमपेज › Konkan › सत्ता गेल्यानंतर राणेंना पारंपरिक मच्छीमार आठवले !

सत्ता गेल्यानंतर राणेंना पारंपरिक मच्छीमार आठवले !

Published On: Feb 20 2018 1:17AM | Last Updated: Feb 19 2018 11:24PMसावंतवाडी : प्रतिनिधी

सत्तेतून पायउतार झाल्यानंतर नारायण राणेंना पारंपरिक मच्छीमार कसे आठवले?असा सवाल  पालकमंत्री दीपक केसरकर यांनी  केला. चांदा ते बांदा योजनेच्या कृषी प्रदर्शनाच्या चर्चासत्रासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. सत्तेत असताना राणे पर्सनेट मच्छीमार्‍यांसोबत होते, मग आता राणेंना पारंपरिक मच्छिमारांचा पुळका का? आम्ही पारंपरिक मच्छीमार्‍यांसोबत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

मासेमारी करणार्‍यांचे ज्यांनी साहित्य चोरले, ज्यांनी पैशांची मागणी केली त्यांच्यावर कारवाई केली गेली व हा चोरलेला मालही पोलिसांनी हस्तगत केला आहे. तसेच ज्या मच्छीमारांनी हद्दीचे उल्लंघन केले त्या गोव्यातील अनधिकृत मासेमारी करणार्‍यांवरसुध्दा कारवाई करण्यात आली आहे. असे ते म्हणाले. आम्ही  मच्छिमारांना हाऊस बोटी दिल्या, राणेंनी त्यांना काय दिले? असा सावाल त्यांनी केला. अवैध मच्छिमारी करणार्‍या पर्ससीन व एलईडी मच्छिमारांना पकडण्यासाठी समुद्रात दूरवर जाणार्‍या गस्तीनौका लवकरच देणार असल्याचे ना. केसरकर यांनी सांगितले.   पोलिसांचे काम योग्य असून पारंपरिक मच्छीमारांसमवेत आम्ही आहोत.