Tue, Apr 23, 2019 13:33होमपेज › Konkan › रत्नागिरी  जिल्ह्यात 16 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी : डॉ. चोरगे

रत्नागिरी  जिल्ह्यात 16 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी : डॉ. चोरगे

Published On: Feb 15 2018 10:30PM | Last Updated: Feb 15 2018 10:28PMरत्नागिरी : प्रतिनिधी

‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेंतर्गत जिल्ह्यात 16 हजार 388 शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ झाला असून त्यांचे 27 कोटी 62 लाख 59 हजार रुपयांचे कर्ज माफ झाले असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

शासनाच्या नियमानुसार कर्जमाफीसाठी 45 हजार 40 सभासदांचे 65 कोटी 41 लाख 49 हजार रकमेचे प्रस्ताव पाठवण्यात आले होते. त्यातील 28 हजार 476 सभासदांची 27 कोटी 65 लाख 24 हजार रुपये शासनाकडून बँकेकडे जमा झाले. त्यातून 16 हजार 388 शेतकर्‍यांना 27 कोटी 62 लाख 59 हजार रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. उर्वरित 12 हजार 88 शेतकर्‍यांची थकबाकीची रक्‍कम 2 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. काही शेतकर्‍यांची तर केवळ 100 रुपयांची थकबाकी आहे. त्याबाबत अद्याप शासनाकडून 
कोणतेही आदेश आलेले नाहीत. त्यामुळे या शेतकर्‍यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचेही डॉ. चोरगे यांनी सांगितले. यावेळी अ‍ॅड. दीपक पटवर्धन, डॉ. अविनाश दिवाकर आदी उपस्थित होते.