होमपेज › Konkan › चिपळुणात ट्रकच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

चिपळुणात ट्रकच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

Published On: May 28 2018 1:41AM | Last Updated: May 27 2018 9:59PMचिपळूण : शहर वार्ताहर

येथे गुहागर बायपास रोड देसाई बाजारजवळ ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने गोविंद रामचंद्र महाडिक  (81) हे वृद्ध गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 27) दुपारी 1.30 वाजता घडली. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. 

याबाबतची फिर्याद वृद्धाचा मुलगा भास्कर गोविंद महाडिक (रा. कामथे) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गुहागर बायपास रोड देसाईबाजार येथून भास्कर व त्यांचे वडील गोविंद महाडिक हे चालत निघाले होते.

यावेळी भरधाव ट्रकने गोविंद महाडिक यांना पाठीमागून जोरात धडक दिली. यात गोविंद महाडिक गंभीर जखमी झाले. त्यामुळे महाडिक यांना लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक पी. एल. चव्हाण करीत आहेत.