Sat, Jul 20, 2019 23:26होमपेज › Konkan › दुचाकी अपघातात महावितरणच्या ठेकेदाराचा मृत्‍यू 

दुचाकी अपघातात महावितरणच्या ठेकेदाराचा मृत्‍यू 

Published On: May 10 2018 10:59PM | Last Updated: May 10 2018 10:59PMरत्नागिरी : प्रतिनिधी

शहरातील धनजीनाका येथे ब्रेक फेल झाल्याने दुचाकी रस्त्याच्या बाजूला भिंतीवर आदळून झालेल्‍या अपघातात महावितरणच्या ठेकेदाराचा जागीच मृत्यू झाला. तर, दुचाकीवर मागे बसलेल्या योगिता अधीकारी या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमोघ भालचंद्र घारपुरे ( रा. झाडगाव) असे अपघातात ठार झालेल्‍या ठेकेदाराचे नाव आहे.  

गुरुवारी रात्री अमोघ घारपुरे हे आपली दुचाकी घेऊन आंबेडकरवाडीच्या उतारातून धनजीनाका येथे येत होते. यावेळी त्‍यांच्या दुचाकीवर पाठीमागे योगिता अधीकारी याही होत्‍या. घारापूर येथील उतार उतरत असताना त्यांच्या दुचाकीचे ब्रेक फेल झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्‍यांनी आरडाओरडा करून रस्त्यातील लोकांना बाजूला होण्याची सूचना केली. काही सेकंदात गाडी रस्त्याच्या बाजूला भितीवर आदळली. त्यात अमोघ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचे जागीच निधन झाले, या अपघातात मागे बसलेल्या योगिता अधीकारी याही गंभीर जखमी झाल्‍या.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, अमोघ यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. जखमी योगिता अधीकारी यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात  हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

Tags : ratnagiri,  contractor,  accident