Wed, Sep 19, 2018 14:24



होमपेज › Konkan › बस अपघातात अंगणवाडी सेविकेचा मृत्यू

बस अपघातात अंगणवाडी सेविकेचा मृत्यू

Published On: Sep 01 2018 10:27PM | Last Updated: Sep 01 2018 10:27PM



रत्नागिरी : प्रतिनिधी

बसमधून खाली उतरताच बसच्या मागील चाकाचा अंगणवाडी सेविकेला धक्का लागला. यानंतर त्यांच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अश्विनी राजकुमार कामत (वय-४२,रा.साईनगर कुवारबाव) असे या महिलेचे नाव आहे. आज, शनिवार (दि. १ सष्टेंबर) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अश्विनी राजकुमार कामत या अंगणवाडी सेविका आहेत. कुणारबाब येथील अंगणवाडी सेविकाच्या गुणगौरव कार्यक्रम आटोपून त्या बसने घरी निघाल्या होत्या. साईनगर बस स्टॉपवर त्या उतरल्या. बस पुढे जात असतानाच त्यांना बसच्या मागील टायरची धडक बसली आणि त्या बसखाली कोसळल्या. या अपघातात बसचा टायर त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच कुवारबाव व साईनगर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या अपघाताची नोंद शहर पोलिस स्थानकात झाली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.