Mon, Nov 19, 2018 02:41होमपेज › Konkan › उन्हवरे खाडीत आढळला मृत डॉल्फीन

उन्हवरे खाडीत आढळला मृत डॉल्फीन

Published On: Mar 07 2018 10:43PM | Last Updated: Mar 07 2018 10:11PMदापोली : प्रतिनिधी

दापोली तालुक्यातील उन्हवरे या खाडीमध्ये डॉल्फीन हा मृत मासा आढळून आला. या माशाचे वजन 70 ते 80 किलो इतके असावे, असा अंदाज येथील पाहाणार्‍या ग्रामस्थांनी वर्तवला. उन्हवरे खाडीमध्ये इतका मोठा मासा येण्याची ही पहिलीच घटना आहे.

हा मासा बोटीच्या पंख्याने जखमी होऊन किंवा नदीमध्ये सोडलेल्या केमिकलच्या पाण्यामुळे मृत झाला असावा असा अंदाज येथील ग्रामस्थांनी वर्तवला. उन्हवरे खाडी ही दाभोळ ते गुहागर अशी वाहते.