होमपेज › Konkan › कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर : केसरकर

कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर : केसरकर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

दापोली : प्रतिनिधी

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आजपर्यंत अनेक संशोधक या देशाला दिले आहेत. नारळ, भात, आंबा तसेच विविध फळांच्या विविध जातींचे संशोधन करून त्यांच्या नवनवीन जाती निर्माण करण्याचे श्रेयही या कृषी विद्यापीठाला जाते. या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील संशोधक विद्यापीठात येत आहेत. जगातील इतर विद्यापीठांनीही या संशोधनाला मान्यता दिल्यामुळे या विद्यापीठाचे संशोधन आंतरराष्ट्रीय  पातळीवर पोहोचले आहे, असे गौरवोद्गार  गृह, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काढले.