Mon, Nov 18, 2019 22:55होमपेज › Konkan › कातकरी समाज आजही भूमिहीन

कातकरी समाज आजही भूमिहीन

Published On: Dec 13 2017 1:55AM | Last Updated: Dec 13 2017 12:13AM

बुकमार्क करा

दापोली : प्रवीण शिंदे

रत्नागिरी जिल्ह्यातील कातकरी आदीम आदिवासी समाज आजही भूमिहीन आहे. हक्काची जागा आणि विविध सोई-सुविधा मिळाव्यात, यासाठी रत्नगिरी जिल्ह्यातील कातकरी समाज वर्षानुवर्षे धडपड करत आहे. समाजातील मुले शिकली आहेत. पण रेशनकार्ड, जातीचे दाखले अशा अडचणी कायम भेडसावत आहेत. यामुळे कातकरी आदीम समाज प्रगत होण्याऐवजी मागासच राहिला आहे. शासन मात्र कातकरी समाजाला सोई-सुविधा पुरविण्यास कमी पडत असल्याचे दिसत आहे

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात एकूण 17 कातकरी आदीम आदिवासी समाजाच्या वाड्या आहेत. त्यामध्ये सुकोंडी, भोमंडी, कांगवई गवळवाडी, कांगवई दुर्गावाडी, विरसई, कलानगर, पाचवली, माटवन, वडवली, भानघर, कुडावले, कांदिवली, शिरखल, शिरसोली, वनशी, मुगीज आणि वेळवी या 17 वाड्या दापोली तालुक्यात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 134 कातकरी वाड्या भूमिहीन आहेत. कुणीही भूमिहीन राहू नये, म्हणून शासन प्रयत्न करत असून रत्नगिरी जिल्ह्यात मात्र कातकरी समाजचे पदरी अधिवास आहे. त्यात दापोली आणि खेड तालुका हा अग्रेसर आहे.

भटकंतीचा त्रास सुटावा आणि कायमची हक्काची जागा मिळावी म्हणून समाज संघटनेने रत्नागिरीच्या जिल्हाधिकार्‍यांकडे धाव घेतली आहे. कातकरी समाजाला हक्काची जागा  मिळावी म्हणून दापोली, खेड, मंडणगड, चिपळूण, गुहागर, संगमेश्‍वर या तहसीलदार यांना कातकरी समाजातील लोकांना त्याचे घरपरडातील जागा हक्काची व्हावी म्हणून तातडीची कारवाई व्हावी, असे निर्देश  देखील जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. मात्र, शासनाला या आधी कातकरी समाजाचे भूमिहीन असल्याचे दिसले नाही का? की कातकरी  समाजाणे हक्कासाठी मागणी करण्याची वाट बघत होते? असा प्रश्‍न समाज विचारात आहे. कातकरी समाज आजही पोटासाठी वणवण फिरत पारंपरिक मासेमारी करत आहे. शेती कातकरी समाजाचे नशिबात नाही. मात्र, शासनाने हक्काची जागा दिली तर कातकरी 
समाजाची परवड थाबेल, यात शंकाच नाही.