Tue, Jul 16, 2019 02:16होमपेज › Konkan › दापोली तालुक्यावर शोककळा

दापोली तालुक्यावर शोककळा

Published On: Jul 28 2018 11:01PM | Last Updated: Jul 28 2018 10:57PMदापोली : प्रतिनिधी

येथील कोकण कृषी विद्यापीठातील 33 कर्मचार्‍यांच्या महाबळेश्‍वर येथील आंबेनळी घाटामध्ये झालेला दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण दापोली तालुक्यावर शोककळा पसरली आहे.दुर्घटनेनंतर मिळालेल्या माहितीनुसार  विद्यापीठातून 34 कर्मचारी दरवर्षीप्रमाणे लावणीचा हंगाम उरकून वर्षा सहलीसाठी दापोलीतून महाबळेश्‍वर आणि त्या ठिकाणची पर्यटनस्थळे पाहण्यासाठी पहाटे निघाले होते. विद्यापीठातील कर्मचार्‍यांचा एक समूह दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी वर्षासहलीसाठी जात असे. शनिवारी पहाटे निघताना या सर्व कर्मचार्‍यांनी सर्वांचे एक छायाचित्र घेतले आणि त्यांची बस दापोलीतून महाबळेश्‍वरकडे रवाना झाली.

दापोलीत कोकण कृषी विद्यापीठाची बस उपलब्ध न  झाल्याने दापोलीबाहेरील विद्यापीठातून  कर्मचार्‍यांनी सहलीसाठी बस मागवली आणि सहलीचा प्रवास सुरु झाला. मात्र, दुपारी 12 वा. च्या सुमारास महाबळेश्‍वर घाटामध्ये ही बस 500 फूट दरीत कोसळल्याची सोशल मीडियामुळे तत्काळ सर्वदूर पसरली. या दुर्घटनेमुळे दापोली तालुक्यामध्ये एकच हाहाकार उडाला. माहिती मिळताच दापोलीतून अनेक गाड्या आणि मृतांचे नातेवाईक महाबळेश्‍वरकडे रवाना झाले. दापोली तालुक्यातील अपघातातील  ही सर्वात मोठी घटना  आहे.

तालुक्यामध्ये या घटनेची माहिती मिळताच शासकीय यंत्रणेसह अनेक हात मदतीसाठी धावले तर विद्यापीठामध्ये रहात असलेले आणि वर्षा सहलीसाठी कर्मचारी यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळींची विद्यापीठामध्ये रीघ लागली.

 या भीषण दुर्घटनेत 33  जणांच्या जाण्याने अनेक कुटुंबांचा पोशिंदा काळाच्या पडद्याआड झाला आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील हे कर्मचारी वर्षा सहलीसाठी आपल्या घरातून परतीचा प्रवास सुखरुप करुन घरी येऊ, असे घराच्यांना सांगून  हे सर्वजण गेले होते. मात्र, त्यांच्यासाठी ही वर्षा सहल शेवटची ठरली. दुर्घटनेत  प्राण गमावलेल्यांपैकी कोकण कृषी विद्यापीठामध्ये काहीजण नुकतेच सेवेमध्ये लागले होते तर काहींचे संसार नुकतेच सावरु लागले होते. 

विद्यापीठाला शनिवार, रविवारची  अशी दोन दिवस सुट्टी असल्याने वर्षा सहलीचा आखलेला बेत या कर्मचार्‍यांसाठी दुर्दैवी ठरला आहे. त्यामुळे सोमवारी कार्यालयीन वेळेत आपल्या सहकार्‍यांसमवेत रोजच्या कामामध्ये एकमेकांना भेटणारे हे 33 कर्मचारी मात्र आता कधीच दिसणार नाहीत. 

शनिवारी सकाळी घडलेल्या दुर्घटनुमुळे दापोली कोकण कृषी विद्यापीठातील सर्वांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, आपला कोणीतरी  आपला सोबती गेला, भाऊ गेला, वडील गेले  म्हणून आक्रोश करताना दिसत आहेत.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये परीक्षा विभागात कार्यरत असलेले कर्मचारी प्रवीण रणदिवे यांनी या वर्षा सहलीला जाण्याची संपूर्ण तयारी केली होती. परंतु, सकाळी त्यांना अचानक उलट्या होऊ लागल्याने त्यांनी सहलीला न जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही तासांतच या धक्कादायक दुर्घटनेची माहिती त्यांना समजली. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच ते या सहलीला जाऊ शकले नाहीत.

 सर्व अपघातग्रस्त दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाचे 

प सकाळी 10.45 वा. घडला अपघात
प बस 800 फूट खोल दरीत कोसळली
प सर्व मृत हे 30 ते 40 वयोगटातील
प 27 मृतदेह गाडीच्या बाहेर सापडले 

प 6 मृतदेह हे गाडीखाली

 पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, मुख्यमंत्र्यांकडून दखल; आर्थिक सहाय्याची ग्वाही

एकूण प्रवासी     34
मृत्यू पावलेले     33
बचावलेला प्रवासी     01
मृतदेह सापडले     27
नावेवाइकांकडे दिले     14
मृतदेह काढण्याचे काम सुरू     13
गाडीखाली अडकलेले मृतदेह     06

मृतांची नावे

सचिन गिणावणेकर, विक्रांत शिंदे, संजीव झगडे, नीलेश तांबे, सुनील कदम, प्रशांत भांबेड, बसचालक संदीप झगडे, सुयश बाळ, संतोष झगडे, राजेश बंडबे, संतोष जळगावकर, रविकिरण साळवी, सचिन झगडे, संजू झगडे, राजाराम गावडे, पंकज कदम, सचिन गिम्हवणेकर, रितेश जाधव, हेमंत सुर्वे, राजेश सावंत, रोशन तबीब, किशोर चौगुले, विकास शिंदे, संदीप सुवरे, सचिन गुजर, राजू रिसबुड, रत्नाकर पागडे, प्रमोद जाधव, संदीप सुर्वे, प्रमोद शिगवण, संदीप भोसले, जयंत चौगुले या 30 ते 40 वयोगटातील शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे.