Tue, Jul 23, 2019 06:18होमपेज › Konkan › भाई जगतापांनी काँग्रेस संपवली : राणे

भाई जगतापांनी काँग्रेस संपवली : राणे

Published On: Jan 03 2018 1:12AM | Last Updated: Jan 02 2018 9:06PM

बुकमार्क करा
दापोली : प्रतिनिधी

भाई जगताप हे अ‍ॅन्टी चेंबर नेता असून दापोलीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस असे समीकरण नवे समीकरण बांधून नगर पंचायतीमध्ये सत्ता स्थापन केली हे समीकरण काँग्रेस पक्षाला पटण्यासारखे नाही. भाई जगताप यांच्यासारख्या काँग्रेसमधील नेत्यांनी काँग्रेस पक्ष संपवली, असे माजी खा. नीलेश राणे यांनी दापोलीत पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. ही पत्रकार परिषद शासकीय विश्रामगृह दि. 2 रोजी आयोजित केली होती. यावेळी ते म्हणाले की, भाई जगताप यांची हिंमत असेल तर त्यांनी दापोली मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी, असे केले तर त्यांची डिपॉजिटही जप्त होईल. राणे हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पक्ष बांधणीसाठी दापोलीत आले होते. येत्या 15 दिवसांत पक्षाची कार्यकारिणी जाहीर करणार असून त्या आधी नऊ तालुक्यांतील तालुकाध्यक्ष यांची निवड करण्यात येणार आहे. त्या नंतरच कार्यकारिणी जाहीर होईल.

नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत विचारणा केली असता शिवसेनेमध्ये प्रकल्प थांबविण्याची कुवत नाही. शिवसेना ही केवळ विरोध करते आणि मागच्या दाराने ठेका घेते. नाणार रिफायनरी प्रकल्पाची जागाही केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते आणि विनायक राऊत यांनी सुचविली असून राऊत हे खोटे बोलत आहेत. ना. गीते हे समाजाची दिशाभूल करीत आहेत, असेही राणे यांनी सांगितले. इतकी वर्ष गीते यांनी मंत्रीपद असताना समाजबांधवांना किती रोजगार दिला हे गीते यांच्या इतक्या वर्षाच्या शिवसेनेतील मंत्री पदावरुन दिसत आहे. त्यामुळे भविष्यामध्ये स्वाभिमान पक्ष प्रामाणिक कार्यकर्ता निवडून लोकांचा विकास करु. त्यासाठी नारायण राणे यांचे नाव संघटना बांधणीसाठी पुरेसे आहे. राणे यांना मंत्रिमंडळात घेणे हा विषय मुख्यमंत्री आणि राणे यांच्यातील आहे. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधाला कोण विचारतंय, असेही नीलेश राणे यांनी सांगितले.

यावेळी माजी खा. नीलेश राणे यानी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना लक्ष्य करताना मुलाला आमदारकीसाठी उभे करण्याऐवजी आधी कोकणचा विकास करा, असेही राणे यांनी सांगितले. यावेळी राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी दापोली तालुक्यातील अनेक कार्यकर्ते तसेच भाजपचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनीही त्यांची भेट घेतली.