होमपेज › Konkan › दापोली-आंबेनळी घाटातील बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा मोर्चा  

दापोली-आंबेनळी घाटातील बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचा मोर्चा  

Published On: Aug 29 2018 8:06PM | Last Updated: Aug 29 2018 7:56PMगिमवी (जि.रत्‍नागिरी) : प्रतिनिधी

दापोली-आंबेनळी घाटातील बस दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांचे कुटुंब व नातेवाईक फाशी द्या फाशी द्या अशा घोषणा देत कोकण कृषी विद्यापीठावर धडकले. आंबेनळी घाटातील हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. 

सर्वपक्षीय कार्यकर्ते या धडक मोर्चात सहभागी झाले होते. प्रकाश सावंत देसाईला बडतर्फ करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. या मागणीसाठी दापोली राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम, शिवसेना भांडुप आमदार अशोक पाटील,  सर्वपक्षीय कार्यकर्ते, नातेवाईक कृषी विद्यापीठावर धडकले. नातेवाईकांचा आक्रोश पाहून कोकण कृषी विद्यापीठाने चौकशी सुरू असे पर्यंत प्रकाश सावंत देसाई यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची ऑर्डर  कुलगुरू तपस भट्टाचार्य यांनी काढली आहे.