Fri, Feb 22, 2019 20:30होमपेज › Konkan › रत्नागिरीत सिलिंडरचा स्फोट

रत्नागिरीत सिलिंडरचा स्फोट

Published On: Jul 20 2018 11:24PM | Last Updated: Jul 20 2018 11:11PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

शहरातील मारुती मंदिर नाचणेरोड मार्गावर दामले हायस्कूलजवळ एका कच्च्या घरात शुक्रवारी दुपारी सिलिंडरने पेट घेतला. रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने ही माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोचून सिलिंडरचा स्फोट होण्यापूर्वीच आग आटोक्यात आणल्याने वित्तहानी टळली.

दामले हायस्कूल येथे नवीन इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतीच्या कामगारांसाठी बांधलेल्या कच्च्या घरात महिला जेवण बनवत होत्या. त्यावेळी दुपारी 12.15 च्या सुमारास शेगडी  आणि सिलिंडरला जोडलेल्या रबरी पाईपने पेट घेतला. त्यामुळे घाबरलेल्या महिला आरडाओरड करत बाहेर पडल्या. ही खबर रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला कळल्यानंतर अग्निशामक चालक शिवलकर, जवान गझने आणि कांबळे यांना घेऊन तातडीने पोहोचले.
अग्निशामक दल पोहोचले तेव्हा आग भडकलेली होती. तातडीने आग विझविण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे सिलिंडरचा स्फोट होऊन कपडालत्ता, भांडी वगैरे मोठ्या प्रमाणात जळले नाहीत. त्यामुळे फारशी वित्तहानी झाली नाही.