कोकण #CycloneNisarga LIVE : सिंधुदुर्गात मुसळधार; मालवण, वेंगुर्ले, देवगडात वाऱ्याचा वेग वाढला

Last Updated: Jun 03 2020 11:34AM
Responsive image


रत्नागिरी/चिपळूण : पुढारी वृत्तसेवा

‘निसर्ग’ चक्रीवादळ आज दुपारी १ पर्यंत अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. या वादळाचे रूपांतर अवघ्या काही तासांत महाचक्रीवादळात होईल. मुंबईच्या अगदी जवळून जात हे चक्रीवादळ अलिबागवर धडकणार आहे. 

काल मध्यरात्री पासूनच गुहागर किनारपट्टीसह दापोली व मंडणगड तालुक्यात सोसाट्याचा वारा वाहू लागला आहे, जोराचा पाऊस पडत आहे, मच्छिमारी नौका किनाऱ्यावरच बांधून ठेवण्यात आल्या आहेत, नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय या तीन तालुक्यातील किनाऱ्यालगतच्या ४ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

पहाटे ४ वाजल्यापासून वादळ घोंगावू लागले असून रात्री पासून पावसाची संततधार सुरूच आहे .वाऱ्याचा वेग किनाऱ्यावर जोरात असून गुहागर ,दापोली व मंडणगड मध्ये नागरिक धास्तावले आहेत. हळूहळू वाऱ्याचा वेग वाढत आहे. दरम्यान, आपत्कालीन यंत्रणा किनाऱ्यावर सज्ज झाली आहे.

कोकण #CycloneNisarga LIVE : सिंधुदुर्गात मुसळधार; मालवण, वेगुर्ले आणि देवगडमध्ये वाऱ्याचा वेग वाढला

अधिक वाचा : 'निसर्ग चक्रीवादळाचा प्रवास होणार पनवेलमधून' (video)

अधिक वाचा : #CycloneNisarga कोरोना संकटात 'निसर्ग' चक्रीवादळाचे अस्मानी संकट! (photos)

अधिक वाचा : गाडीत अडकलात तर अशी 'घ्या' काळजी!

अधिक वाचा : #CycloneNisarga मुंबई LIVE : सर्व विमानांची उड्डाणे रद्द

अधिक वाचा :  अलीबाग #CycloneNisarga Live : अलिबागमध्ये ताशी ७० किमी वाऱ्याचा वेग