Mon, Jul 15, 2019 23:38होमपेज › Konkan › सावित्री पात्रातील मगरींचा फेक व्हिडिओचा झाला गहजब! 

सावित्री पात्रातील मगरींचा फेक व्हिडिओचा झाला गहजब! 

Published On: May 04 2018 7:29PM | Last Updated: May 04 2018 7:29PMमहाड : प्रतिनिधी

महाड तालुक्यातील सावित्री नदीपात्रामधील मगरींच्या बनावट व्हिडिओने सर्वत्र गहजब झाला आहे. शासन पातळी वरून मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने वन प्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे. प्राणिमित्र संघटनेचे कार्य हे समाजातील वन्यप्राणी जीवांच्या हिताचे रक्षण व मार्गदर्शकांचे असल्याने मुख्य समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने दिसून येत आहे .

सन 2005 च्या महाडमधील महापुरानंतर मगरींचे वास्तव्य या सावित्री नदी पात्रामध्ये आढळून येण्यास सुरुवात झाली होती. आज या मगरींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सावित्री पात्रासह महाड तालुक्यातील ग्रामीण भागामध्येही या मगरी आढळत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

तर, नदीपात्रातील हा व्हिडिओ फेक कि खरा हा विषय वेगळा असला तरीही या निमित्ताने मगरीची ही समस्या पुन्हा समोर आली आहे. मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होतानाचे दिसत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांत याबाबत जागरूकता निर्माण करण्याची गरज असताना याबाबत कोणतीही पावले उचली जात नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

वनखात्याकडून देण्यात आलेली कबुली या बाबत आवश्यक असणाऱ्या जबाबदारीचे द्योतक नव्हती हे स्पष्ट करणारी ठरली आहे. महाड तालुक्यातील सावित्री  नदीपात्रापासून सुमारे दहा ते बारा किलोमीटर अंतरात असणाऱया ग्रामीण भागांमधील ही विहिरींमध्ये मगरींचे वास्तव्य आढळुन येत असल्याने ग्रामीण भागातील विहिरींवर तसेच नदीवर पाण्या करता जाणाऱ्या महिला लहान मुलांकरिता ही संकटाची चाहूल व भीती निर्माण करणारी ठरणार आहे याबाबत वनखात्यामार्फत कोणत्याही तालुक्यातील ठिकाणी मगरींचे असणाऱ्या  वास्तव्याबाबत नामफलक अथवा माहिती देण्यात  आलेली नाही.

तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये आढळणाऱ्या मगरींच्या वास्तव्याबाबत ग्रामपंचायत व प.समितीमध्ये विचारणा केली असता वनखात्यामार्फत अशाप्रकारची कोणतीही सूचना देण्यात आली नसल्याची माहिती पाहता वनखात्यामार्फत याबाबत कोणतीही विशेष कार्यवाही होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.