Tue, Nov 20, 2018 21:06होमपेज › Konkan › तरूणीची बदनामी करणार्‍या बाप-लेकाविरूद्ध गुन्हा

तरूणीची बदनामी करणार्‍या बाप-लेकाविरूद्ध गुन्हा

Published On: Dec 02 2017 12:39AM | Last Updated: Dec 01 2017 11:23PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

लग्‍नाचे आमिष दाखवून तरुणीशी शारीरिक संबंध ठेवून नंतर लग्‍नास नकार दिल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध तसेच तिची गावी बदनामी केल्याप्रकरणी तरुणाच्या बापाविरुद्ध देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विनायक विठोबा गोरुले (26, मूळ रा.  किरबेट, संगमेश्‍वर) आणि बाप विठोबा गोरुले (रा. किरबेट,संगमेश्‍वर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार ती आणि विनायक गोरुले यांच्यात मैत्री होती. हे  दोघेही कामानिमित्त मुंबईत होते. तेव्हा विनायकने तिला लग्‍नाचे आमिष दाखवून फेब्रुवारी 2016 ते 12 नोव्हेंबर 2016 या कालावधीत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

यानंतर त्याने तिच्याशी लग्‍न करण्यास नकार दिला. तसेच विनायकच्या बापाने संगमेश्‍वर गावी तिची बदनामी केली. याप्रकरणी पीडित तरुणीने गोवंडी पोलिस ठाणे (मुंंबई) येथे बाप-लेकाविरुद्ध तक्रार दिल्यानंतर झिरो नंबरने ही तक्रार देवरुख पोलिस ठाण्यात पाठवण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक विक्रमसिंग पाटील करत आहेत.