Wed, Jan 23, 2019 16:53होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : धर्मांतराच्या संशयावरून मारहाण; ६ जणांवर गुन्हा

सिंधुदुर्ग : धर्मांतराच्या संशयावरून मारहाण; ६ जणांवर गुन्हा

Published On: Aug 26 2018 10:42PM | Last Updated: Aug 26 2018 10:25PMदोडामार्ग : प्रतिनिधी

हिंदू धमीर्र्यांचे जबरदस्तीने धर्मांतर केले जात असल्याच्या संशयावरून दोडामार्ग-सावंतवाडा येथील काही जणांनी तेथीलच चंद्रकांत पिळणकर व त्यांच्या सहकार्‍यांना शनिवारी मारहाण केली होती. याबाबत पिळणकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोडामार्ग पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. 

चंद्रकांत पिळणकर यांच्या घरात प्रार्थनेच्या नावाखाली हिंदू धर्मियांचे धर्मांतर केले जात असल्याचा आरोप करत शनिवारी काही जणांनी त्यांच्या घरात घुसत त्यांना मारहाण केली होती. तसेच घरातील साहित्याचीही तोडमोड केली होती. याप्रकरणी रविवारी सुरेश चंद्रशेखर बिराजदार (46, दोडामार्ग-गावडेवाडी) यांनी दोडामार्ग पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गोपाळ गणेश गावडे, भिकाजी गोपाळ गावडे, अभिषेक खांबल, सुधीर सावंत, संतोष आरोंदेकर, लक्ष्मण आरोंदेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.