Mon, Jun 17, 2019 05:05होमपेज › Konkan › कशेडी घाटात कंटेनर घसरला, सुदैवाने जीवित हानी नाही

कशेडी घाटात कंटेनर घसरला, सुदैवाने जीवित हानी नाही

Published On: Jun 28 2018 7:47PM | Last Updated: Jun 28 2018 7:47PMपोलादपूर : प्रतिनिधी

मुंबई - गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. कशेडी घाट उतरत असताना कंटेनर वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटून साईडपट्टीवर कोसळला. येलंगेवाडी गाव हद्दीत आज, बुधवार दि. २८ जुन सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

याबाबत कशेडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कंटेनर चालक मनीष संदर रस्तोगी (वय, 35 रा. कळंबोली) हा कंटेनर क्रमांक (डिएन ०९ टी ९५९१) घेऊन कशेडी घाट उतरत होता. यावेळी अचानक चालकांचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर घाटाच्या साईडपट्टीवर घसरला. चालकाने वेळीच प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या अपघातात कोणतीही  जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच कशेडी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मधुकर गमरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले.