Tue, Jun 18, 2019 20:56होमपेज › Konkan › विधानसभा निवडणुकीनंतर काँगे्रसचीच सत्ता : आ. खलिफे

विधानसभा निवडणुकीनंतर काँगे्रसचीच सत्ता : आ. खलिफे

Published On: May 07 2018 2:02AM | Last Updated: May 06 2018 11:43PMराजापूर : प्रतिनिधी

देशात आणि राज्यात काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा जोमाने काम करत असून सन 2019 ला होणार्‍या लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचीच सत्ता येणार असल्याचे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या कार्याध्यक्षा व विधान परिषद सदस्या हुस्नबानू खलिफे यांनी केले. 

राजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी तसेच काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष इच्छुक असलेल्यांनी आपले अर्ज संपूर्ण माहितीसह सुपूर्द करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. राजापूर नगर वाचनालय सभागृहात रविवारी राजापूर तालुका काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार सौ. हुस्नबानू खलिफे बोलत होत्या.
यावेळी व्यासपिठावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्‍ते हरिष रोग्ये, राजापूर माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी, प्रभारी नगराध्यक्ष जमीर खलिफे, माजी तालुकाध्यक्ष आबा दुधवडकर, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मनोहर सप्रे, पंचायत समितीचे माजी सभापती सदानंद चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संघटनात्मक बांधणीवर चर्चा करण्यात आली. संघटना वाढीसाठी बुथ कमिट्या व ग्रामकमिट्या नेमण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीमध्ये राजापूर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी, तसेच राजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज हुस्नबानू खलिफे यांच्याकडे सुपूर्द करण्याचे ठरले. आगामी महिनाभरात जिल्हा कार्यकारिणीसह तालुका कार्यकारिणीच्या नियुक्त्या जाहीर होतील, असे यावेळी सौ. खलिफे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे 2019साठी होणार्‍या राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर चाचपणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी विधानसभेसाठी योग्य त्या वेळी प्रदेशाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या उच्चस्तरीय कमिटीमध्ये निर्णय घेण्यात येईल, असे खलिफे यांनी सांगितले.

यावेळी बैठकीला जितेंद्र खामकर, ओमकार प्रभुदेसाई, दिवाकर मयेकर, जयप्रकाश नार्वेकर, युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रसाद मोहरकर, राजापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जावेद ठाकूर, नगरसेवक सुलतान ठाकूर, सुभाष बाकाळकर, नगरसेविका सौ.स्नेहा कुवेसकर, हनिफ युसूफ काझी, बंडूशेठ पाटणकर, सुरेश कोळेकर, संतोष कुळये आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, या बैठकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबाबत चाचपणी करण्यात आली. या वेळी बैठकीमध्ये अनेकांनी प्रभारी नगराध्यक्ष अ‍ॅड.जमीर खलिफे यांच्या नावाला पसंती दिल्याचे बोलले जात आहे. या बैठकीमध्ये अ‍ॅड. खलिफे वगळता अन्य कोणतेही नाव चर्चेत आले नाही. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी अ‍ॅड. खलिफे यांचे नाव निश्‍चित मानले जात आहे. सन 2019मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी अजित यशवंतराव यांचा पक्षप्रवेश करून घेऊन त्यांना उमेदवारी देण्याची सूचना काहींनी मांडली. मात्र, यशवंतराव यांना काँग्रेसमध्ये घेण्यास मोठ्या प्रमाणात विरोध असल्याचे या बैठकीमध्ये दिसून आले.