Thu, Apr 25, 2019 04:13होमपेज › Konkan › कबुलायतदारप्रश्‍नी आंबोलीत फेरसर्वेक्षण

कबुलायतदारप्रश्‍नी आंबोलीत फेरसर्वेक्षण

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 05 2018 10:27PMसावंतवाडी ः प्रतिनिधी

आंबोली आणि  गेळे गाव कबुलायतदारप्रश्‍नी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात प्रमुख अधिकारी आणि दोन्ही गावचे 15 गावकरी यांच्या उपस्थितीत संयुक्‍त बैठक पार पडली. या बैठकीत आंबोली गावच्या फेरसर्वेक्षणाचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले असून, येत्या तीन आठवड्यांत जनतेचे म्हणणे ऐकून घेऊन तसा अहवाल सादर करण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले.

ही बैठक मुंबई येथे झाली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत महसूल सचिव मनुकुमार श्रीवास्तव, उपसचिव वीर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी आ. राजन तेली, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, सावंतवाडी भाजपतालुकाध्यक्ष महेश सारंग, नगरसेवक मनोज नाईक, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे आदी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये दोन्ही गावचे 15 गाव काबुलायतदार गावकरी उपस्थित होते. गेळेच्या जागा वाटपाची मागणी गावकर्‍यांनी केली.  जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना आंबोली गावाच्या सर्व्हेक्षणाचे आदेश देण्यात आले असून जनतेचे म्हणणे ऐकून  घेऊन एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले. या गावामध्ये खासगी वन जमीन म्हणून चुकीची नोंद झाल्याची कबुली महसूलमंत्र्यानी गावकर्‍यांसमोर दिली. या गावातील कबुलायतदार  प्रश्‍न सुटण्यासाठी अंतिम टप्प्यावर आला  आहे.