Wed, Feb 26, 2020 09:38होमपेज › Konkan › आंगणेवाडी यात्रा स्थळावरील मूलभूत सुविधा पूर्ण करा

आंगणेवाडी यात्रा स्थळावरील मूलभूत सुविधा पूर्ण करा

Published On: Dec 28 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 10:32PM

बुकमार्क करा
ओरोस : प्रतिनिधी

आंगणेवाडी यात्रा 27 जानेवारी रोजी आहे. या यात्रेपूर्वी आंगणेवाडीकडे जाणारे सर्व रस्ते, आंगणेवाडी येथे पिण्याच्या पाण्याची सुविधा, विद्युत व्यवस्था, बीएसएनएल ची संपर्क यंत्रणा सक्षम करणे,आरोग्य सुविधा, एसटी वाहतूक या सर्व मूलभूत सुविधा यात्रेपूर्वी पूर्ण कराव्यात, अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे आयोजित बैठकीत दिली. 

जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित सभेत खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षितकुमार गेडाम, आंगणेवाडी ग्रामस्थ संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आंगणेवाडीसाठी स्वतंत्र व कायम स्वरूपी पिण्याच्या पाण्याची योजना प्रस्तावित करण्याची सूचना करून ना. केसरकर म्हणाले, बीएसएनएल विभागाने टॉवरची क्षमता वाढवावी.

एस.टी. विभागाने रेल्वे स्थानकावर कक्ष कार्यान्वित  करण्याबरोबरच रेल्वेच्या वेळापत्रकाप्रमाणे एसटी बसेसची व्यवस्था करावी. सार्वजनिक बांधकम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने आंगणेवाडीकडे जाणार्‍या रस्त्यांची डागडुजी यात्रेपूर्वी पूर्ण करावी, आवश्यक तेथे दिशादर्शक फलक लाववेत, हेलपॅडची सुविधा अधिकची हवी असल्यास तशी कार्यवाही करावी, आदी सूचना त्यांनी यावेळी दिल्या.